घरताज्या घडामोडीगौरवास्पद : भारतीय वंशाची 'ही' महिला न्यूयॉर्क पोलीस दलात कॅप्टनपदी नियुक्त

गौरवास्पद : भारतीय वंशाची ‘ही’ महिला न्यूयॉर्क पोलीस दलात कॅप्टनपदी नियुक्त

Subscribe

भारतीय वंशाच्या पोलीस अधिकारी प्रतिमा भुल्लर मालडोनाडो यांची न्यूयॉर्क पोलीस दलात कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मालडोनाडो या पदावर नियुक्त झालेल्या दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

भारतीय वंशाच्या पोलीस अधिकारी प्रतिमा भुल्लर मालडोनाडो यांची न्यूयॉर्क पोलीस दलात कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मालडोनाडो या पदावर नियुक्त झालेल्या दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. प्रतिमा भुल्लरची गेल्या महिन्यात कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्या सध्या साउथ रिचमंड हिल भागातील 102 व्या पोलिस स्टेशनचे प्रमुख आहेत. (Indian Origin Police Officer Pratima Bhullar Becomes Highest Ranking South Asian Woman In NYPD)

प्रतिमा भुल्लर यांचा जन्म पंजाबमध्ये झाला असून त्या नऊ वर्षे पंजाबमध्ये वास्तव्यास होत्या. वयाच्या 9व्या वर्षी प्रतिमा भुल्लर या त्यांच्या पालकांसह न्यूयॉर्कला गेल्या. ‘हे घरी परतल्यासारखे आहे. मी माझ्या आयुष्यातील 25 वर्षांहून अधिक वर्षे या क्षेत्रात घालवली आहेत’, असे रिचमंड हिल क्षेत्राची कर्णधार बनल्यावर प्रतिमा म्हणाल्या. दक्षिण रिचमंड परिसरात शीख समुदायाचे लोक मोठ्या संख्येने राहतात.

- Advertisement -

“लहानपणी मी ज्या गुरुद्वारात जायची, आता त्याच गुरुद्वारात कॅप्टन म्हणून जाणार आहे आणि हे मजेशीर आहे. कॅप्टन म्हणून माझी भर कम्युनिटी पोलिसिंगवर असेल”, असे प्रतिमा भुल्लर म्हणाल्या.

“कधी कधी तुमच्या कामाचे कौतुक होत नाही पण तरीही काम करावे लागते. ही एक मोठी जबाबदारी आहे आणि मला केवळ माझ्या समाजासमोरच नाही तर महिला, मुले आणि प्रत्येकासाठी पोलिसांचे चांगले उदाहरण ठेवायचे आहे. माझे वडील न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवायचे, त्यांनी खूप मेहनत केली. पोलिस खात्यात रुजू होण्यापूर्वी 2006 मध्ये त्यांचे निधन झाले. माझ्या वडिलांना माझा अभिमान असेल”, असेही न्यूयॉर्क पोलिसात उच्च पदावर पोहोचल्यावर प्रतिमा भुल्लर म्हणाल्या.

- Advertisement -

दरम्यान, न्यूयॉर्क पोलिस विभागामध्ये 33,787 सदस्य आहेत. ज्यापैकी 10.5 टक्के आशियाई आहेत.


हेही वाचा – बडवा काय बडवायंच ते, आमच्या बापाचं काय जातंय; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -