घरदेश-विदेशमंदीच्या काळात 'इंडिगो'ने दिली ३०० विमानांची विक्रमी ऑर्डर

मंदीच्या काळात ‘इंडिगो’ने दिली ३०० विमानांची विक्रमी ऑर्डर

Subscribe

या विक्रमी विमान खरेदीमुळे इंडिगोच्या विमान ताफ्यात ३०० विमानांचा समावेश

भारतीय विमान कंपनी इंडिगोने विमान खरेदीची विक्रमी ऑर्डर दिली आहे. इंडिगो कंपनीकडून आपल्या महत्वकांक्षी व्यापार वाढीकरिता युरोपच्या एअरबस इंडस्ट्रीला ३०० विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे. इंडिगोने या क्षेत्रातील ‘ए-३२० निओ फॅमिली’च्या तब्बल ३०० विमानांची ऑर्डर देत हा विक्रम केला आहे. दरम्यान इंडिगोकडून मिळालेली ही ३०० विमानांची ऑर्डर मोठी असल्याने ती विक्रमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

इंडिगोकडून एअरबस कंपनीकडे करण्यात आलेला हा व्यवहार पुर्ण होत आला असून या ऑर्डरमध्ये ए-३२०-निओ, ए-३२१-निओ आणि ए-३२१-एक्सएलआर या विमानांच्या खरेदीचा समावेश आहे. या विक्रमी विमान खरेदीमुळे इंडिगोच्या विमान ताफ्यात ३०० विमानांचा समावेश होणार आहे.

ही ऑर्डर ऐतिहासिक आहे. एअरबस कंपनीला कोणत्या एका एअरलाइनकडून मिळालेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात जलद विकास होण्याची अपेक्षा आम्हाला आहे. आम्ही ग्राहकांना अजून स्वस्त दरात सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच इतर योजनांची पूर्तता करणार आहोत

रोनोजॉय दत्त, इंडिगो सीईओ

- Advertisement -

इंडिगो एअरलाइन्सने आपल्या कामाचे स्वरूप आणि कामकाजाची व्याप्ती वाढविणे आवश्यक असल्याने ए ३२१ एक्सएलआरचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी इंडिगोने २००५ ते २०१५ च्या काळात देखील तीन टप्प्यांमध्ये ५३० एअरबस विमानांची ऑर्डर दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -