घरताज्या घडामोडीपिझ्झ्याच्या दुकानात नोकरीचा अर्ज घेऊन आला आणि टिप बॉक्स घेऊन पळाला!

पिझ्झ्याच्या दुकानात नोकरीचा अर्ज घेऊन आला आणि टिप बॉक्स घेऊन पळाला!

Subscribe

एक तरूण मुलगा आपल्या नोकरीचा अर्ज घेऊन पिझ्झाच्या दुकानात गेला, पण अचानक त्याचा विचार बदलला आणि तो दुकानात असलेल्या टिप बॉक्स घेऊन पळला. ही घटना पूर्व पेनसिल्व्हेनियामध्ये घडली आहे. खरं तर, पेनसिल्व्हेनियाच्या उत्तरी कॅटासौका येथील पिझ्झा डी ओरोच्या अधिकाऱ्याने सांगितले की मार्क नावाचा एक तरुण नोकरीसाठी अर्ज घेऊन २६ ऑगस्टला स्टोअरमध्ये आला होता, पण त्याच वेळी त्याने अचानक काउंटरवरून ठेवलेला टिप बॉक्स उचलला आणि तिथून पळ काढला.

माझ्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. पण त्याने अचानक चाकू बाहेर काढला आणि कर्मचाऱ्यांवर रोखला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मागे फिरावे लागले. नंतर तो मुलगा पळत जंगलात निघून गेला. त्या टीप बॉक्समध्ये २२० डॉलर होते.

- Advertisement -

त्या तरूणाच्या बॅगमध्ये अनके वस्तू होत्या. त्याचे ओळखपत्र, काही ड्रग्ज होते, त्याने नोकरीसाठी अर्ज केल्यामुळे त्याचे नाव आणि नंबर कर्मचाऱ्यांकडे होता. यावरून त्याचा तपास करण्यात आला. शुक्रवारी नॉर्थहॅम्प्टन काउंटी येथे मार्कला अटक करण्यात आली. दरोडे, चोरी, हत्यारे बाळगणे, प्राणघातक हल्ला करणे आणि ड्रग्ज विक्री करणे या आरोपाखाली शुक्रवारी मार्क यांना अटक करण्यात आली आहे.


हे ही वाचा – अमिताभ बच्चन यांची नात नव्या डिप्रेशनची शिकार; व्हिडिओतून व्यक्त केल्या भावना!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -