घरदेश-विदेशसलमान रश्दींवरील हल्ल्यानंतर गुप्तचर संस्था सतर्क, नुपूर शर्मांचा धोका?

सलमान रश्दींवरील हल्ल्यानंतर गुप्तचर संस्था सतर्क, नुपूर शर्मांचा धोका?

Subscribe

अमेरिकेतील न्युर्यार्क शहरात लेखल सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या चाकू हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणा नूपुर शर्मा यांच्या सुरक्षेवरून चींतीत झाली आहे. अलकायदाकडून मुस्लिमांना नुपुर शर्माच्या विधानाबाबत न्यायाचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय उपखंडात अस्तित्वात असणाऱ्या अलकायदा ने जून मिहिन्यात आपल्या एका प्रवक्त्याच्या माध्यमातून निवेदन जारी केले होते. यामध्ये नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद विषयी केलेल्या विधानाचा बदला घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

अलकायदाच्या प्रवक्त्या निवेदन –

- Advertisement -

पैगंबर यांच्याविषयी नूपुर शर्मा द्वारे करण्यात आलेल्या विधानाचा बदला घेण्यासाठी काही लोक दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मुंबईमध्ये आत्मघाती स्फोटांसाठी तयार आहेत. जर आपण मोहम्मद पैगंबर यांच्या सन्मानाचे संरक्षण करू शकलो नाही तर आपण उद्धवस्त होऊ. हा व्हिडिओ उत्तर प्रदेश राज्यातील संभल जिल्ह्याशी संबंधित एक्यूआयएस प्रमुख आसिम उमर यांनी एका प्रश्नाच्या स्वरुपात पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी विचारले होते की, असे कोणी आहे की, जे पैगंबर मोहम्मद यांच्या सन्मानासाठी आपला जीव देऊ शकेल.

ओसामा आणि जवाहिरीचा फोटोसह विचारला सवाल –

- Advertisement -

ओसामा बिन लादेनच्या एक फोटो पोस्ट करत एक्यआयएने जर तुमचे बोलण्याचे स्वातंत्र्य नियंत्रणाच्या बाहेर जात असेल तर आम्ही जे करणार आहोत, त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार रहा. त्याबोरबर नुकतेच मारण्यात आलेल्या अयमान अल जवाहिरीच्या फोटोसोबत मुस्लिमांना विचारण्यात आले की, तुमचा राग व आत्मसन्मान कोठे आहे, असे म्हटले होते.

नुपूर शर्मा कडक सुरक्षा व्यवस्थेत  –

सध्या नूपुर शर्मा यांना पोलीस कोठडीत अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांच्या जीवाला असणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर संस्था सतर्क झाल्या आहेत. नूपुर शर्मा यांच्या  समर्थनार्थ पोस्ट केल्यानंतर भारतात उदयपुर आणि अमरावती शहरात दोन हत्या झाल्या आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -