घरदेश-विदेशInternational Men's Day 2021 : हमे भी दर्द होता है! आंतरराष्ट्रीय पुरुष...

International Men’s Day 2021 : हमे भी दर्द होता है! आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त यंदाची थीम, त्यामागचा इतिहास नेमका काय?

Subscribe

स्त्रिया नेहमी आपल्या भावना उघडपणे जवळच्या व्यक्तीसमोर व्यक्त करतात. मात्र पुरुष आपले सुख, दु:ख अनेकदा कोणासमोरही व्यक्त करताना दिसत नाहीत. यामुळे पुरुषांकडून अनेकदा हमे भी दर्द होता है! अस मत व्यक्त होताना आपण पाहतो. घरात कोणासोबतही दु:खद प्रसंग घडला तरी पुरुष मनमोकळं रडू शकत नाही. या पुरुषांच्या मनात अनेक भावना वर्षोनूवर्षे दाबून राहिलेल्या असतात. यामुळे पुरुषांच्या या सकारात्मक भावनेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी १९ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. पुरुषांवर होणारे अत्याचार, शोषण, पक्षपात, हिंसा आणि असमानता पाहता या जगभरातील ८० देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. भारतातही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

दरवर्षी आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त एक थीम जाहीर केली जाते. या थीमच्या आधारे वर्षभर जगभरातील अनेक देश पुरुषांसाठी विविध जगजागृतीपर कार्यक्रम, चर्चा सत्र किंवा सामाजिक कार्य करत असतात.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस थीम (International Men’s Day 2021 Theme)

यंदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसानिमित्त यंदा ‘Better relations between men and women’ या थीमची घोषणा करण्यात आली आहे. गेल्यावर्षी २०२० मध्ये ‘Better Health for Men and Boys’ ही थीम होती. या थीमचा उद्देश पुरुष आणि मुलांना महिलांप्रमाणे महत्त्व देणे तसेच त्यांचे आरोग्य आणि विकासासाठी प्रयत्न करणे हा आहे.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास (International Men’s Day History) 

जागतिक महिला दिनाप्रमाणे दरवर्षी पुरुष दिनही साजरा केला जातो. १९२३ पासून काही पुरुषांनी २३ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याची मागणी केली जात होती. पण त्यावेळी काही निर्णय झाला नाही. मात्र १९९१ साली हा दिवस पून्हा एकदा साजरा करण्याची संकल्पना मांडण्यात आली. शेवटी १९९९ पासून त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या नागरिकांनी पुढाकार घेत पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला आणि जगभरात मग हा दिवस साजरा होई लागला. यानंतर डॉ. जीरोम तिलकसिंह यांचे या क्षेत्रातले कार्य लक्षात घेत त्यांच्या वडिलांच्या जन्मदिवसानिमित्त १९ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतात २००७ पासून आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यास पहिल्यांदा सुरुवात झाली. त्यानंतर दरवर्षी हा दिवस साजरा होत आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे महत्त्व (International Men’s Day Importants) 

पुरुषांच्या आरोग्याप्रती, लिंग संबंधांविषयी जागरुकता, लैंगिक समानतेचा विकास असा अनेक उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. दरम्यान महिलांच्या तुलनेत दरवर्षी पुरुषांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण हे तीनपट आहे. यात घरघुती हिंसाचाराला बळी पडत तीन पैकी एक पुरुष आत्महत्या करतोय. त्यामुळे महिलांच्या तुलनेत पुरुषांचे मृत्यू होण्याचे वय पाच वर्षे कमी होत आहे.  या सर्व गोष्टींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला जातो. यात कुटुंब, समाज, समुदाय, समाज व्यवस्था या सर्वामध्ये पुरुषांच्या योगदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्यामागचा उद्देश

समाजातील पुरुष आदर्शांना प्रोत्साहन, समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि वातावरणात पुरुषांचे सकारात्मक योगदानावर चर्चा करणे, पुरुषांच्या आरोग्यावर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे; तसेच पुरुषांच्या सामाजिक, भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिक गोष्टींवर चर्चा करणे. पुरुषांबरोबर होणारा भेदभाव उघड करणे. लैंगिक संबंध सुधारणे आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे. एक सुरक्षित आणि चांगले जग निर्माण करणे. हा आहे.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -