घरदेश-विदेशINX MEDIA CASE: पी.चिदंबरम यांच्यासह मुलगा कार्तीविरोधातील CBI याचिकेवर सोमवारी सुनावणी

INX MEDIA CASE: पी.चिदंबरम यांच्यासह मुलगा कार्तीविरोधातील CBI याचिकेवर सोमवारी सुनावणी

Subscribe

आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरमविरोधातील सीबीआय याचिकेवर सोमवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सीबीआयने दिल्ली हायकोर्टात दाखल केली आहे. याच याचिकेवर उद्या सुनावणी पार पडेल.

यापूर्वी दिल्ली हायकोर्टाने १८ मे रोजी पी.चिदंबरम यांच्याविरोधातील खटल्याच्या सुनावणीला स्थगिती दिली होता. तर चिदंबरम, कार्ती आणि इतरांना नोटीस बजावत सीबीआयच्या याचिकेवर उत्तर मागितले होते.

- Advertisement -

आयएनएक्स मीडिया भष्ट्राचार प्रकरणी सीबीआयने २१ ऑगस्ट २०२१ रोजी पी.चिदंबरम यांनी अटक केली. याचवेळी १६ ऑक्टोबरला ईडीने काळ्या पैशाच्या प्रकरणात चिदंबरम यांना बेड्या ठोकल्या. यानंतर २२ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात चिदंबरम यांचा जामीन मंजूर केला. सशर्त जामीनावर सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांची सुटका केली. पी. चिदंबरम यांनी चौकशीला सहकार्य करत देश सोडून न जाण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे पी.चिदंबरम यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र १७ ऑक्टोंबरपासून ईडी कोठडीत राहत जवळपास १०६ दिवस त्यांनी तुरुंगवास काढले.


पंतप्रधान मोदी १० ऑगस्टला करणार ‘उज्वला 2.0’ ची घोषणा, कोट्यवधी नागरिकांना मिळणार फायदा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -