घरदेश-विदेशदेशात 16 दिवसात 14 वेळा पेट्रोल डिझेलची दरवाढ, जाणून घ्या आजचा दर

देशात 16 दिवसात 14 वेळा पेट्रोल डिझेलची दरवाढ, जाणून घ्या आजचा दर

Subscribe

मुंबईसह देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वाढत्या इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. देशात १६ दिवसांत १४ वेळा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. २२ मार्चपासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेल तब्बल १० रुपयांनी महागलं आहे.

मुंबईसह देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वाढत्या इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. देशात १६ दिवसांत १४ वेळा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. २२ मार्चपासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेल तब्बल १० रुपयांनी महागलं आहे. तसंच आज सीएनजीच्या दरांतही अडीच रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं गेल्या १६ दिवसांतील ही चौदावी दरवाढ आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रत्येकी ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचे दर १२० रुपयांच्या पार पोहोचले आहेत. मुंबईत प्रति लिटर पेट्रोल १२०.५१ रुपये आणि प्रति लिटर डिझेल १०४.७७ रुपयांवर पोहोचलं आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत १०५.४१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९६.६७ रुपयांवर पोहोचलं आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती देत आहेत. सध्या देशात पेट्रोल-डिझेलसह एलपीजी सिलिंडर, दूध, भाजीपाला यासह दैनंदिन वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामन्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे.

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

- Advertisement -

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.


हेही वाचा – मुंबईत सीएनजी 7 रुपयांनी महागला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -