घरदेश-विदेशऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती

ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती

Subscribe

मध्य प्रदेशचे पोलीस अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाली.

मध्य प्रदेशचे पोलीस अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाली. शुक्ला हे १९८३ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ऋषी कुमार शुक्ला यांच्या नावावर पंतप्रधान यांच्या निवड समितीने शिक्कामोर्तब केला आहे. या समितीमध्ये मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी नेता मल्लिकार्जुन खर्गे यांचा समावेश होता. शुक्ला यांची नियुक्ती दोन वर्षांकरता करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी मध्य प्रदेशच्या डीसीपीसह इतर पदांवर कार्यभार सांभाळला आहे.

- Advertisement -

सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना १० जानेवारी रोजी पदावरून हटवण्यात आल्यानंतर एम. नागेश्वर राव यांच्याकडे हंगामी संचालकपद सोपवण्यात आले होते. दरम्यान, नव्या संचालकांची नियुक्ती रखडल्याने सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त करताच त्याच्या दुसऱ्या दिवशी आज निवड समितीने शुक्ला यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -