घरताज्या घडामोडीकबाबमुळे सापडला ISIS दहशतवादी; सिरीयातून गेला होता स्पेनला

कबाबमुळे सापडला ISIS दहशतवादी; सिरीयातून गेला होता स्पेनला

Subscribe

इस्लामिक स्टेटचा (Islamic State) एक दहशवतादी कबाब खाण्याच्या नादात पोलिसांच्या हाती लागला आहे. एकेकाळी रॅपर राहिलेला ३१ वर्षीय अब्दुल-माजिद अब्दुल बारी ISIS कडून सिरियामध्ये लढाई करण्यासाठी गेला होता. तेथून तो स्पेनला गेला. परंतु यादरम्यान कबाब ऑर्डर करण्याच्या चक्करमध्ये तो पकडला गेला. वाचा हा पूर्ण किस्सा….

मिरर यूकेच्या वृत्तानुसार, ब्रिटनचा राहणारा अब्दुल बारी २०१३ सालाच्या पूर्वी सिरिया पोहोचला होता. त्याचे वजन सामान्यांपेक्षा अधिक (१३० किलो) होते. परंतु काही वर्षानंतर तो अल्जीरियाला पोहोचला आणि नंतर स्पेनमध्ये राहून लागला. यादरम्यान स्पॅनिश पोलिसांच्या गुप्तचरांना माहिती मिळाली. पण त्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते, तो नेमका कुठे आहे?

- Advertisement -

एकेदिवशी सोशल मीडियावर पोस्टवरून स्पॅनिश पोलिसांना दोन संशयित लोकांकडून सतत ऑनलाईन कबाब ऑर्डर केल्याची माहिती मिळाली. ज्यानंतर पोलिसांनी एका खोलीची रेकी सुरू केली. स्पॅनिश पेपर एल पैसनुसार, बारीने अटकेच्या पाच दिवसांपूर्वी १५ एप्रिल २०२०ला स्थानिक वेळेनुसार रात्री १०.४६ मिनिटांनी कबाब ऑर्डर केला होता. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या रात्री १० वाजता कबाब ऑर्डर केला. मग तिसऱ्या वेळेला १८ एप्रिलला पुन्हा ऑर्डर केली.

यादरम्यान गुप्तचरांच्या माध्यमातून पोलिसांनी अब्दुल बारीला कानावरून ओळखले. कारण त्याचे वजन खूप वाढले होते आणि त्याचा कोणताच नवा फोटो नव्हता. पोलिसांनी छापा टाकून बारीच्या दोन साथीदारांसोबत अटक केली. त्याच्या जवळून ४३ हजार डॉलरच्या किंमतीचे बिटकॉईन आणि इतर पुरावे जप्त केले आहेत. तो हल्ला करणार होता असे म्हटले जात आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, यापूर्वी सिरियामध्ये इराक लष्कारने त्याला पकडले होते. परंतु त्याचे वजन इतके जास्त होते की, तो पोलिसाच्या गाडीत बसून शकत नव्हता. त्यामुळे त्याला ट्रकमध्ये टाकून जेलमध्ये घेऊन जाण्यात आले होते. सध्या अब्दुल बारी मॅड्रिड जवळील सोटो डेल रियल जेलमध्ये बंद आहे.


हेही वाचा – Uri Operation: उरीत सापडला १९ वर्षीय दहशतवादी; पैशांच्या लालसेपोटी लष्कर-ए-तोयबामध्ये झाला होता सामील


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -