जम्मू काश्मीरमध्ये बसचा भीषण अपघात; 6 जवानांचा मृत्यू तर 32 जखमी

itbp bus accident jammu kashmir pahalgam 6 jawan death and 32 injured

जम्मू काश्मीर :  जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. 39 सुरक्षा दलाच्या जवानांना घेऊन जाणारी बस चंदनवाडी परिसरातील खोल दरीत कोसळली आहे. यात 6 जवानांचा मृत्यू झाला असून 32 कर्मचारी जखमी झाले आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील चंदनवाडीमध्ये ब्रेक फेल झाल्याने ही बस नदी कोसळली. यावेळी बसमध्ये सुरक्षा दलाचे 39 कर्मचारी (इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाचे 37 आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन) होते.

हे जवान बसमधून अमरनाथ यात्रेच्या ड्युटीवरून परतत होते. या घटनेची माहिती मिळताच ITBP कमांडो घटनास्थळी रवाना झाले असून बचावकार्य जलद सुरु आहे. या सर्व जवानांना एअर लिफ्ट करत उपचारांसाठी भारतीय लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात एक मिनी बस दरीत कोसळली होती, त्यात 18 जण जखमी झाले होते. बसमधील बहुतांश विद्यार्थी होते. मिनीबस बारमिनहून उधमपूरच्या दिशेने जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि घोर्डी गावाजवळ बस दरीत कोसळली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.11 विद्यार्थ्यांसह 18 जखमींना उधमपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.