घरदेश-विदेशबेपत्ता असलेले जॅक मा आले जगासमोर; व्हिडिओद्वारे दिला 'हा' संदेश

बेपत्ता असलेले जॅक मा आले जगासमोर; व्हिडिओद्वारे दिला ‘हा’ संदेश

Subscribe

गेले काही महिने बेपत्ता असलेले आशियातील श्रीमंत उद्योगपती आणि अलीबाबाचे संस्थापक जॅक मा पहिल्यांदा जगासमोर आले आहेत. अलिबाबा आणि अँट समुहाचे संस्थापक हे बेपत्ता असल्याच्या चर्चा सुरु होत्या. जागतिक स्तरावर जॅक मा यांच्याविषयी चर्चा सुरु होत्या. दरम्यान, आता जॅक मा यांचा एक व्हिडिओ समोर आला असून जॅक मा बेपत्ता असल्याच्या चर्चांणा पूर्णविराम लागला आहे. जॅक मा यांनी बुधवारी २० जानेवारीला ऑनलाईन कॉन्फरन्सद्वारे शिक्षकांना संबोधित केलं.

जॅक मा यांनी बुधवारी एका ऑनलाईन कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षकांशी संवाद साधला. हा एक वार्षिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाद्वारे त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षकांशी संवाद साधला. जॅक मा यांनी देशभरातील १०० ग्रामीण शिक्षकांशी संवाद साधला. कोरोना संपल्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटू असं अलिबाबांनी यावेळी शिक्षकांना सांगितलं.

- Advertisement -

गेल्या तीन महिन्यांपासून जॅक मा बेपत्ता

जॅक मा समोर आल्यानंतर त्यांच्याशी संबंधित अफवा संपुष्टात येतील. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२० पासून जॅक मा जगासमोर न आल्यामुळे बेपत्ता असल्याच्या चर्चा सुरु होत्या. जॅक मा यांच्या जगासमोर येण्यामुळं आता भविष्याबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित झालेल्या अलिबाबा आणि अँट समुहाला यापासून मदत मिळणार आहे. चीनकडून अँट समुहाचे ३५ बिलियन डॉलरचे आयपीओ रोखल्यानंतर आणि अलिबाबाचीही चौकशी सुरु झाल्यानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच जॅक मा हे सार्वजनिकपणे कुठेही दिसले नव्हते.


हेही वाचा – पुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक पक्षाला रामराम ठोकणार?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -