घरदेश-विदेशपुलवामासारख्या हल्ल्याची शक्यता; जम्मू-काश्मीर हायवेवर रेड अलर्ट

पुलवामासारख्या हल्ल्याची शक्यता; जम्मू-काश्मीर हायवेवर रेड अलर्ट

Subscribe

जम्मू-काश्मीर महामार्गावर पुलवामा हल्ल्यासारखा आयईडीचा स्फोट घडवून आणला जाऊ शकतो. या हल्ल्यासाठी मोटारसायकलचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे.

भारतामध्ये सध्या लोकसभा निवडणूकीचा जोरदार प्रचार सुरु आहे. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट दहशतवाद्यांकडून रचत असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुन्हा एकदा पुलवामा हल्ल्यासारखा दहशतवादी हल्ल्याच कट रचला जात आहे.’ हा हल्ला मोटारसायकलवरुन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर हायवेवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून जम्मू-काश्मीर हायवेवर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

महामार्गावर हाय अलर्ट जारी

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचर विभागाला दहशतवादी हल्ल्याच्या कटाची माहिती मिळाली आहे. या माहितीनुसार,’ दहशतवादी जम्मू-काश्मीर हायवेला लक्ष्य करु शकतात. या महामार्गावर पुलवामा हल्ल्यासारखा आयईडीचा स्फोट घडवून आणला जाऊ शकतो. या हल्ल्यासाठी मोटारसायकलचा वापर केला जाऊ शकतो’, अशी माहिती मिळाली आहे. दहशतवाद्यांच्या या कटाची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. सीमाभागामध्ये पाकिस्तांकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. याचाच फायदा घेत दहशतवादी घुसखोरी करत हा मोठा हल्ला घडवून आणू शकतात.

- Advertisement -

मोटारसायकलने हल्ला करण्याच्या प्रयत्नात

१४ फेब्रुवारीला जम्मूकाश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला लक्ष्य केले. आरडीएक्सने भरलेली कार बसला धडकवून दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. तसाच हल्ला रविवारी सकाळी होण्याची माहीत गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. मात्र हा हल्ला मोटारसायकलचा वापर करुन केला जाणार आहे. रविवारी सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान हा मोटारसायकलचा स्फोट घडवून हल्ला होण्याची माहिती मिळाली होती. श्रीनगरमधील बटवारा आणि टॅट्टू ग्राऊंड परिसर हा अतिसंवेदनशील असून याठिकाणी बॉम्बस्फोट केला जाण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तविली आहे. त्यानंतर या महामार्गावर अलर्ट देत बंदोबस्त वाढवण्यात आला.

जैशच्या दहशतवाद्यांकडून माहिती आली समोर

शनिवारी शोपियांमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले होते. त्याआधी जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची चौकशी केली असता अशी माहिती समोर आली की, मसूद अजहर जम्मू-काश्मीमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत आहे. हे कळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -