JEE Main Exam 2021: जेईईच्या चौथ्या सत्र परीक्षेची तारीख बदलली, जाणून घ्या नवीन तारखा

चौथ्या सत्रात रजिस्ट्रेशन करण्यासाठीची तारीखही वाढवण्यात आली असून विद्यार्थी २० जुलै २०२१पर्यंत jeemain.nat.nic.in वर रजिस्ट्रेशन करु शकतात

JEE Main Exam 2021: JEE 4th session exam date changed, see new dates

जेईईच्या (JEE)  चौथ्या सत्र परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आले आहेत. जेईईच्या चौथ्या सत्रातील परीक्षा (JEE 4th session exam)  पुढे ढकलण्यात आली असून नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आता जेईई मेन परीक्षेचे चौथे सत्र २६, २७ ऑगस्ट आणि १ व २ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. (JEE Main Exam 2021: JEE 4th session exam date changed, see new dates)  काही दिवसांपूर्वीच जेईई परीक्षांच्या तारखा घोषित करण्यात आल्या होत्या. जेईई मेन चौथ्या सत्र परीक्षा २७ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार होत्या मात्र आता त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जेईईच्या चौथ्या सत्रातील परीक्षेसाठी आतापर्यंत ७.३२ लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. चौथ्या सत्रातील परीक्षेची तारीख बदलण्यासोबतच चौथ्या सत्रात रजिस्ट्रेशन करण्यासाठीची तारीखही वाढवण्यात आली असून विद्यार्थी २० जुलै २०२१पर्यंत jeemain.nat.nic.in वर रजिस्ट्रेशन करु शकतात,असे म्हटले आहे.

जुन्या वेळापत्राकानुसार, जेईईच्या तिसऱ्या सत्रातील परीक्षा या २० ते २५ जुलै दरम्यान घेण्यात येणार आहेत आणि चौथ्या सत्रातील परीक्षा २७ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार होत्या. दोन्ही सत्रांच्या परीक्षांमध्ये केवळ दोन दिवसांचे अंतर ठेवण्यात आले होते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. जेईईच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातील परीक्षेत काही दिवसांचे अंतर असावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. त्यानुसार आता जेईई परीक्षांच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातील परीक्षांमधील अंतर वाढवण्यात आले आहे.

जेईईच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रांच्या परीक्षांचा विचार केला असता दोन्ही सत्रांच्या परीक्षांमध्ये १५ दिवसांचे अंतर होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील सत्राच्या अभ्यासासाठी वेळ मिळाला होता. त्याचप्रमाणे तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातील परीक्षेमधील अंतर वाढवावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती, ती मागणी पूर्ण करण्यात आली आहे.

 


हेही वाचा – SSC Result 2021: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार