घरताज्या घडामोडीLalu Prasad Yadav Bail : लालू प्रसाद यादवांना जामीन मंजूर, राजदमध्ये आनंदाचे...

Lalu Prasad Yadav Bail : लालू प्रसाद यादवांना जामीन मंजूर, राजदमध्ये आनंदाचे वातावरण

Subscribe

चारा घोटाळ्यातील ५ प्रकरणांमध्ये राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांना झारखंड कोर्टाने दिलासा दिला आहे. लालू प्रसादग यांना जामीन मंजूर करण्यात आला असून राजदमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं आहे. जस्टिस अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठाने शुक्रवारी काही अटी शर्थींच्या आधारावर जामीन मंजूर केला आहे. जेलमधून सुटल्यावर लालू प्रसाद यादव यांना १० लाख रुपये जमा करावे लागणार आहे. तसेच एक- एक लाखाचे दोन बेल रिमांड बाँड भरावे लागणार आहेत. यानंतर कोर्टाकडून रीलीज ऑर्डर जारी करण्यात येणार आहे.

राजद सुप्रीमो आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावर तब्बल दोन तास सुनावणी सुरु होती. दोन तासांच्या सुनावणीनंतर जस्टिस अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठाने दिलासा दिला आहे. डोरंडा कोषागरमधून अवैधरित्या निधीचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या आरोपांत दोषी आढळल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. अखेर त्यांच्या जामीन अर्जावर झारखंड हायकोर्टात सुनावणी झाली कोर्टाने त्यांचा जामीन अटींच्या आधारावर मंजूर केला आहे.

- Advertisement -

उच्च न्यायालयाने लालू यादव यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने लालू यादव यांना जामीन मंजूर केला आहे. लालू प्रसाद यादव यांनी सुमारे ४० महिने तुरुंगात घालवले आहेत जो शिक्षेचा अर्धाकाळ म्हणजेच ३० महिन्यांपेक्षा जास्त आहे असे कोर्टाने म्हटलं आहे. लालू यादव यांना सीबीआय न्यायालयाने शिक्षेसोबत निश्चित केलेल्या दंडाच्या रकमेपैकी १० लाख रुपये न्यायालयात जमा करावे लागतील, अशी अट न्यायालयाने जामिनासाठी ठेवली आहे.

लालू प्रसाद यादव यांचे वकील आणि सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला. यानंतर न्यायाधीशांनी लालूंना जामीन देण्याचा निर्णय घेतला आहे. डोरंडा ट्रेझरी प्रकरणात लालूप्रसाद यांच्या जामीनाला विरोध करणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणा, सीबीआयचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला आहे. जामीन मिळाल्यानंतर लालू प्रसाद यादव आता तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

- Advertisement -

डोरंडा कोषागारातून बेकायदेशीरपणे पैसे काढल्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांचा तुरुंगवास आणि ६० लाखांचा दंड ठोठावला आहे. या आदेशाविरोधात लालू प्रसाद यादव यांनी झारखंड उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यांनी कोर्टाकडे जामीनही मागितला होता. लालू प्रसाद यादव यांच्या वतीने वाढत्या वयाचा आणि १७ प्रकारच्या आजारांचा हवाला देत जामीन मागितला होता. याप्रकरणी लालूप्रसाद यांनी ४१ महिने तुरुंगात काढल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले. तर अर्धी शिक्षेची मुदत फक्त ३० महिने आहे. निम्म्याहून अधिक शिक्षा भोगून ते ११ महिन्यांपासून तुरुंगात आहेत असे लालू प्रसाद यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.

काय आहे प्रकरण?

डोरंडा ट्रेझरी प्रकरणात लालू प्रसाद यांना अटक करण्यात आली आहे. डोरंडा कोषागारातून १३९ कोटी रुपये आणि १९९० ते ९५ च्या दरम्यान डोरंडा तिजोरीतून १३९ रुपये कोटी काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. २७ वर्षानंतर फेब्रुवारीमध्ये त्यांच्यावर न्यायालयाने आपला निर्णय दिला. लालू प्रसाद यादव दोषी आढळल्यामुळे त्यांना ५ वर्षांची शिक्षा करण्यात आली होती.


हेही वाचा : Boris johnson: बोरिस जॉन्सन स्वागतावर म्हणाले, मला सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन…

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -