घरदेश-विदेश2014 नंतर परदेशातील 4000 हून अधिक भारतीयांनी केल्या आत्महत्या: आखाती देशांमध्ये आत्महत्या...

2014 नंतर परदेशातील 4000 हून अधिक भारतीयांनी केल्या आत्महत्या: आखाती देशांमध्ये आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक

Subscribe

परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. यूएईमध्ये नोकरीसाठी गेलेल्या 1122 लोकांनी गेल्या 8 वर्षांत आत्महत्या केल्या आहेत.

भारतातील अनेक तरुणाई परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न असते. मात्र काही तरुणांचे हे स्वप्न पूर्ण होते तर काहींचे अधुरे राहते. मात्र भारतातील मोठ्या संख्येने लोक आज परदेशात नोकरी करत आहेत. परंतु उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी परदेशात जाणाऱ्या या भारतीयांमध्ये आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. गेल्या 8 वर्षात नोकरीसाठी परदेशात गेलेल्या 4000 हून अधिक भारतीयांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडे उपलब्ध माहितीनुसार, 2014 पासून इतर देशांमध्ये 4005 भारतीयांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

आखाती देशांमध्ये सर्वाधिक भारतीयांना रोजगार उपलब्ध आहे. परंतु परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक भारतीयांच्या आत्महत्या या आखाती देशांमध्ये झाल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

- Advertisement -

2014 पासून कोणत्या देशात किती भारतीयांनी आत्महत्या केल्या आहेत?

संयुक्त अरब अमिराती  – 1122
सौदी अरब –              1024
कुवेत –                    425
ओमान –                  351
मलेशिया –                254
बहारीन –                 180
कतार –                  165
सिंगापूर –                159
इटली –                   65
ऑस्ट्रेलिया –             33
कॅनडा –                 30
अमेरिका –              19
फिलीपिन्स –            15
नायजेरिया –            12
श्रीलंका –               11

परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की, बहुतांश आत्महत्या या वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे झाल्या आहेत. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने असाही दावा केला की, परदेशात काम करणाऱ्या भारतीय कामगारांना प्राधान्य दिले जाते. त्यांच्या तक्रारी आणि समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न केले जातात.

- Advertisement -

लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले की, परराष्ट्र मंत्रालय आणि आमचे मिशन पोस्ट भारतीय नागरिकांच्या कल्याणाला उच्च प्राधान्य देतात. विशेषत: भारतीय कामगार, जे प्रवासी भारतीयांचा एक प्रमुख भाग आहेत. परदेशात भारतीयांना भेडसावणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी भारतीय अधिकारी सक्रियपणे काम करतात.


ऐकावं ते नवलच! चक्क चोरीच्या विजेतून नागपुरात संजय राऊतांची सभा; उर्जामंत्र्यांच्याच शहरातील धक्कादायक प्रकार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -