घरदेश-विदेशहिंदुत्वावर केलेल्या 'त्या; ट्वीटप्रकरणी कन्नड अभिनेता चेतन कुमारला अटक

हिंदुत्वावर केलेल्या ‘त्या; ट्वीटप्रकरणी कन्नड अभिनेता चेतन कुमारला अटक

Subscribe

कन्नड अभिनेता चेतन कुमार याने हिंदूंविषयी केलेल्या आक्षेपार्ह ट्वीटनंतर त्याला बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे.

कन्नड अभिनेता चेतन कुमार याने हिंदूंविषयी केलेल्या आक्षेपार्ह ट्वीटनंतर त्याला बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. चेतन कुमारने ट्वीट केले आहे की, हिंदुत्वाचा आधारच खोटा आहे. तसेच, भगवान राम रावणाचा वध करुन अयोध्येला परतले तेव्हा भारताला खरी ओळख मिळाली, ही सावरकरांची थ्योरीदेखील चुकीची आहे. त्याच्या या ट्वीटनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी स्थानिक न्यायालयात त्याला हजर केले जाणार आहे.

कन्नड अभिनेता चेतन कुमार याने हिंदू धर्माविषयी वादग्रस्त ट्वीट केल्यानंतर त्याची पोलिसांत तक्रार करण्यात आली. मिळालेल्या तक्रारीवरुन बंगळुरुमधील शेषाद्रीपुरम पोलिसांनी त्याला अटक केली. चेतनच्या विरोधात हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याप्रकरणी तसेच, हिंदू धर्माचा अपमान केल्याप्रकरणी आईपीसी सेक्शन 295ए आणि 505 बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

चेतन कुमारने 20 मार्चला केलेल्या ट्वीटमध्ये हिंदुत्वाला केवळ खोटंच म्हटलं नाही तर बाबरी मस्जिदच्या जागेवर राम जन्मभूमि नसल्याचेही म्हटले आहे. तसेच, हिंदूत्वाच्या या खोटेपणाला आपण खरं बोलून हरवू शकतो, असेही चेतन यांने ट्वीटमध्ये लिहिले आहे. चेतन शर्माने केलेल्या या वादग्रस्त ट्वीटनंतर बजरंग दलातील शिवकुमार यांनी या विरोधात FIR दाखल केली आहे.

( हेही वाचा: भाजपच्या ‘या’ नेत्याचा राज्याच्या राजकारणातून काढता पाय; म्हणाले, नो महाराष्ट्र ओनली राष्ट्र )

- Advertisement -

याआधीही केलीत वादग्रस्त वक्तव्ये

फेब्रुवारी 2022 मध्ये हिजाब केसप्रकरणी सुनावणी करणा-या न्यायाधीशांविरोधातही आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावेळी देखील चेकनला अटक करण्यात आली होती. याशिवाय ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्यांवरुनही त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या.

( हेही वाचा: मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जाची निवडणूक आयोग करणार समीक्षा )

भाजपचा दावाही खोटा असल्याचे चेतनचे वक्तव्य

कर्नाटक निवडणुकीत वोक्कलिगा समुदायाचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप दावा करत आहे की उरीगौडा आणि नांजेगौडा यांनी टिपू सुलतानची हत्या केली होती. तर 1798 मध्ये चौथ्या म्हैसूर युद्धात टिपूला निजामासह इंग्रजांनी मारले होते असे इतिहासकारांचे मत आहे. भाजपच्या या दाव्यालाही चेतनने नाकारले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -