घरताज्या घडामोडीकर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भाजपला मोठा धक्का

कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भाजपला मोठा धक्का

Subscribe

आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. पक्षांतर्गतही मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधक भाजप सरकारविरोधात एकवटताना दिसत आहेत. यावेळी भाजपचे माजी नेते आणि माजी उपमुख्यमंत्र्यांनी काँगेसमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हात पकडला आहे.

कर्नाटक राज्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी याबाबतची माहिती दिली. सावदी यांना १२ एप्रिल रोजी अथानी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे सावदी यांनी पक्षावर तीव्र नाराजी व्यक्त करत विधान परिषदेच्या आमदारकीचा आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. सावदी अथणीतून तीन वेळा विधानसभेत पोहोचले आहेत.

- Advertisement -

लक्ष्मण सावदी यांनी काँग्रेस नेते शिवकुमार यांची त्याच्या बंगळुरू येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर विद्यमान विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. परंतु अथणी विधानसभा मतदार संघातून तिकीट न मिळाल्यामुळे लक्ष्मण यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने २९ मार्च रोजी पत्रकार परिषद घेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती. कर्नाटकात एकाच टप्प्यात हे मतदान होणार आहे. कर्नाटक राज्यात १० मे रोजी एकूण २२४ जागांसाठी मतदार पार पडणार आहे. तर १३ मे रोजी निकाल लागणार आहे.

कर्नाटक विधानसभा आणि आकडेवारी

एकूण जागा – २२४
मॅजिक फिगर – ११३
भाजप – ११७
काँग्रेस – ६९
जेडीएस – ३२
इतर – ६


हेही वाचा : हवाई दलाच्या विदेशी युद्धसरावात राफेलचा सहभाग, भारताबरोबरच इतर देशांचाही समावेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -