घरदेश-विदेशदिल्लीमध्ये घातपात करण्यासाठी जाणाऱ्या तरुणाला अटक

दिल्लीमध्ये घातपात करण्यासाठी जाणाऱ्या तरुणाला अटक

Subscribe

दिल्लीमध्ये १५ ऑगस्टला स्फोट घडवून आणण्यासाठी निघालेल्या काश्मीरी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाकडून ८ ग्रेनेड साठा आणि ६० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. काश्मीरवरुन दिल्लीला हा तरुण निघाला असता पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

१५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्य दिनी राजधानी दिल्लीमध्ये घातपात करण्याचा कट पोलिसांनी उधळवून लावला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी याप्रकरणी एका काश्मिरी तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकीश दरम्यान दिल्लीमध्ये स्फोट करण्याचा दहशतवादी कट असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

८ ग्रेनेडचा साठा जप्त

जम्मू-काश्मीरच्या गांधीनगर येथून रविवारी रात्री पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ८ ग्रेनेड आणि ६० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. या तरुणाचे नाव अरफान वानी असून तो पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील रहिवासी आहे. अरफान दिल्लीला जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

आरोपीची कसून चौकशी सुरु

अरफानची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्या दरम्यान त्याने दिल्लीमध्ये मोठी दहशतवादी कारवाई करणार असल्याचा खुलासा झाला. अरफान जो शस्त्रसाठी घेऊन दिल्लीला निघाला होता ते तो दिल्लीमध्ये एकाजवळ देणार होता. १५ ऑगस्टच्या दिवशी राजधानी दिल्लीमध्ये स्फोट करण्याचा त्यांचा कट होता.

- Advertisement -

१५ ऑगस्टला दहशतवादी कारवाई करण्याचा कट

सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यांनी ही कारवाई केली आहे. सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीनुसार लष्कर-ए-तोएबा, जैश-ए-मोहम्मद, हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांनी १५ ऑगस्टला काश्मीरपासून ते दिल्लीपर्यंत मोठ्या दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला होता. दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दहशतवाद्याची चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -