घरदेश-विदेशगर्भवती हत्तीणीच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही; मुख्यमंत्री विजयन

गर्भवती हत्तीणीच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही; मुख्यमंत्री विजयन

Subscribe

या घटनेनंतर केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मारेकऱ्यांचाा शोध सुरु

केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात स्थानिक गावकऱ्यांनी एका हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला. २७ मे रोजी घडलेली ही घटना केरळमधील वन-अधिकाऱ्याच्या फेसबूक पोस्टमुळे पुढे आली. ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर एकच हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली असून दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मारेकऱ्यांचाा शोध सुरु आहे.

दरम्यान, या गर्भवती हत्तीणीच्या मृत्तूप्रकरणात केरळ राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार या प्रकरणातील दोषींना शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासंदर्भात चौकशी सुरू असल्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले. तीन लोक संशयास्पद आहेत. आम्ही दोषींना शिक्षा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.

- Advertisement -

त्यांनी असेही सांगितले की, केरळचा समाज असा आहे जो अन्यायाविरूद्ध उठलेल्या आवाजाचा आदर करतो. या घटनेत जर काही चांगले घडले असेल तर हे असे आहे की, आपण इतरांवर होणाऱ्या अन्यायविरूद्ध आपला आवाज उठवू शकतो. म्हणून अशी व्यक्ती होऊ या, जो प्रत्येक वेळी, सर्व प्रकारच्या होणाऱ्या अन्यायविरूद्ध सर्वत्र आवाज उठवेल.

- Advertisement -

असा घडला होता प्रकार

केरळच्या मल्लपूरम जिल्ह्यात स्थानिकांनी एका गर्भवती हत्तीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. हा अननस पोटात फुटल्यामुळे या हत्तीणीचा अखेरीस मृत्यू झाला. “हे फळ खाल्ल्यानंतर ते तिच्या पोटात फुटलं. हा धमाका इतका मोठा होता की हत्तीणीची जीभ आणि तोंडाला चांगलीच दुखापत झाली होती. या वेदना आणि भूक सहन होत नसल्यामुळे हत्तीण गावांमधून सैरावैरा पळत होती. या वेदनेमुळे तिला काहीही खाता येत नव्हतं. अशाही परिस्थितीत तिने एकाही व्यक्तीला इजा पोहचवली नाही. एकही घर तिने तुडवलं नाही. मला तरी ती एखाद्या देवीप्रमाणेच वाटली.” मोहन क्रिश्नन यांनी मल्याळम भाषेत हा घटनाक्रम आपल्या फेसबूक वरून सांगितले

മാപ്പ്… സഹോദരീ .. മാപ്പ് …അവൾ ആ കാടിന്റെ പൊന്നോമനയായിരുന്നിരിക്കണം. അതിലുപരി അവൾ അതിസുന്ദരിയും സൽസ്വഭാവിയും…

Mohan Krishnan ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮೇ 30, 2020


जाणून घ्या घटना-  भुकेलेल्या गर्भवती हत्तीणीला दिले फटाक्याने भरलेले अननस; तडफडून झाला मृत्यू

दरम्यान,  केरळच्या Silent Valley National Park चे वॉर्डन सॅम्युअल पचाऊ यांनी IANS वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली. “या प्रकारामागे जे कोणी असतील त्यांचा आम्ही शोध घेऊ. एखाद्या प्राण्याची हत्या करणं गुन्हा आहे आणि गुन्हेगारांना पकडल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -