घरताज्या घडामोडीप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 'खलिस्तान झिंदाबाद'चे पोस्टर्स, पोलिसांकडून दखल

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ‘खलिस्तान झिंदाबाद’चे पोस्टर्स, पोलिसांकडून दखल

Subscribe

दिल्लीत खलिस्तान जिंदाबादचे पोस्टर्स रंगवण्यात आले आहेत. तसेच काही भिंतींवर खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा रंगवण्यात आल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी हे प्रकरणं अतिशय गांभीर्यानं घेतलं आहे.

खलिस्तान झिंदाबाद, सार्वमत घ्या, अशा प्रकारच्या घोषणा भिंतींवर रंगवण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. दिल्लीच्या पश्चिम विहार भागात आज ही घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी या सर्व घोषणा पुसून टाकल्या असल्याचं दिल्ली पोलिसांचे पीआरओ सुमन नलवा यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

काही तरुणांनी या घोषणा भिंतींवर रंगवल्या आहेत. पण हा शहराच्या सुरक्षेसंबंधीचा विषय नाही. या प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहितीही सुमन नलवा यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : Budget 2023 : रेल्वेचे रुपडे पालटणार, १.९ लाख कोटींची तरतूद अपेक्षित


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -