घरदेश-विदेशकिम जोंगची खेळी; गद्दाराला शोधण्यासाठी स्वतःच पसरवली मृत्यूची अफवा

किम जोंगची खेळी; गद्दाराला शोधण्यासाठी स्वतःच पसरवली मृत्यूची अफवा

Subscribe

काही दिवसांपासून उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या गायब होण्याची बातमी प्रसार माध्यमांवर येत होती. त्यांचे निधन झाले असून त्यामुळे ते जगासमोर येत नसल्याचेही म्हटले जात होते. मात्र दोन दिवसांपूर्वी किम जोंग स्वतः जनतेसमोर आले आणि सर्व अफवांना पूर्णविराम लागला. परंतू त्यांच्या गायब होण्यामागचं कारण आता समोर येत असून त्यांनी स्वतःच आपल्या मृत्यूची अफवा पसरवल्याचे म्हटले जात आहे. किम जोंग यांच्या आजूबाजूला असलेल्यांपैकीच कोणीतरी त्यांच्या जीवावर उठला आहे. त्या गद्दाराला शोधण्यासाठी ही खेळी त्यांनी केली असल्याचे दि सन यांच्या अहवालातून समोर आले आहे. किम जोंग यांची सत्तेवरील पकड कमकुवत करण्याच्या प्रयत्नात असलेल्याला शोधून काढण्यासाठी हे नाटक केले असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा – Coronavirus – ‘लवकरच महायुद्ध होणार…’ अभिनेत्याचं वादग्रस्त ट्वीट

- Advertisement -

२१ दिवस होते गायब 

काही दिवसांपूर्वी किम जोंग उन अचानक गायब झाले होते. त्यानंतर अनेकांनी त्यांचा मृत्यू झाला असावा असे तर्कवितर्क लावले. मात्र, आठ दिवसानंतर किम जोंग उन पुन्हा एकदा मीडियासमोर आले. किम जोंग उन यांची प्रकृती बिघडल्याने उपचार सुरू होते अशाही चर्चा समोर येत होत्या. मात्र, शुक्रवारी तब्बल २१ दिवसांनंतर किम जोंग उन सर्वांसमोर आले. केसीएनएने दिलेल्या वृत्तानुसार किम जोंग उन यांनी सुनचिओनमध्ये एका कारखान्याच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली होती. हे ठिकाण राजधानी प्योंगयांगच्या जवळ आहे. किमची बहीण किम यो जोंगदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -