घरदेश-विदेशAAP : भाजपाचा हेतूच हा आहे... राजकुमार आनंद यांच्या राजीनाम्यानंतर आपची प्रतिक्रिया

AAP : भाजपाचा हेतूच हा आहे… राजकुमार आनंद यांच्या राजीनाम्यानंतर आपची प्रतिक्रिया

Subscribe

Lok Sabha Election 2024 : राजकुमार आनंद यांच्याकडे ईडीने दिवसभर छापे टाकले होते. राजकुमार आनंद भ्रष्ट असल्याचे भाजप वारंवार सांगत होती. भाजपच्या मोठ्या नेत्यांनी देखील अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. पण आता आनंद यांनी पक्ष सोडल्यावर या प्रतिक्रिया बदलू शकतात, असा खोचक टोला सिंह यांनी भाजपाला लगावला. कदाचित भाजपचाच एखादा बडा नेता त्यांचे पक्षात स्वागत करताना देखील दिसेल.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेता आणि अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिला आहे. पटेल नगर येथील आमदार असलेल्या आनंद यांनी पक्षाचा राजीनामा देताना पक्षावर अनेक आरोप देखील केले आहेत. तसेच भ्रष्टाचाराबाबत पक्षश्रेष्ठींना काही प्रश्न विचारले आहेत. नुकतेच जामिनावर बाहेर आलेले आप नेता संजय सिंह आणि सौरभ भारद्वाज यांनी आनंद यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. (Lok Sabha Election 2024 Rajkumar Anand resigned due to ed raid, said Sanjay Singh, Saurabh Bhardwaj)

तुम्हाला कमकुवत करणे, हाच भाजपचा हेतू आहे. दिल्ली आणि पंजाबमधील सरकार पाडण्याची त्यांची इच्छा आहे. ही आपल्यासाठी परीक्षेची वेळ आहे, आणि नेमक्या याच वेळी तुम्ही हार मानली आहे, अशा शब्दांत आप नेत्यांनी आनंद यांना फटकारले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पोपट सांगतोय उमेदवाराचे भविष्य…मालकाला घेतले ताब्यात

आपला संपवण्याचा हेतू?

संजय सिंह म्हणाले की, केजरीवाल यांना अटक करण्यामागे आम आदमी पार्टीला संपवण्याचा हेतू असू शकतो. सध्या जी ईडी कारवाई सुरू आहे, त्यामागे भ्रष्टाचार उघड करणे हा नाही तर केवळ आम आदमी पक्षाला दुबळं करण्याचा हेतू आहे. ईडी – सीबीआयचा वापर करत भाजप आमदारांना फोडण्याचे काम करत असल्याची टीका देखील सिंह यांनी केली. यामुळेच सध्याचा काळ आपसाठी परीक्षेचा काळ आहे. आपली ओळख काय म्हणून असावी हे शेवटी आपण ठरवायचे आहे. (Lok Sabha Election 2024 Rajkumar Anand resigned due to ed raid, said Sanjay Singh, Saurabh Bhardwaj)

- Advertisement -

राजकुमार आनंद यांच्याकडे दिवसभर ईडीने छापे टाकले होते. राजकुमार आनंद भ्रष्ट असल्याचे भाजप वारंवार सांगत होती. भाजपच्या मोठ्या नेत्यांनी देखील अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. पण आता आनंद यांनी पक्ष सोडल्यावर या प्रतिक्रिया बदलू शकतात, असा खोचक टोला सिंह यांनी भाजपाला लगावला. कदाचित भाजपचाच एखादा बडा नेता त्यांचे पक्षात स्वागत करताना देखील दिसेल. (Lok Sabha Election 2024 Rajkumar Anand resigned due to ed raid, said Sanjay Singh, Saurabh Bhardwaj)

हेही वाचा – Narendra Modi : लोकशाही धोक्यात आहे असे सांगणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान मोदींनी सुनावले खडेबोल

तर दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, राजकुमार आनंद यांच्याबद्दल आम्ही काहीच वाईट बोलणार नाही. त्यांचा परिवार आहे, हे आम्हाला माहीत आहे. ईडी त्यांना पकडून तुरुंगात टाकेल आणि मग ते बराच काळ तुरुंगातच राहतील, याची त्यांना भीती वाटते आहेत, हे आम्ही समजू शकतो. मी जेव्हा – जेव्हा सक्रिय होतो, मला फोन येतोच, अशा शब्दात अनेकदा त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांसमोर आपली व्यथा देखील मांडली आहे. अशा प्रकारे एका मंत्र्याला धमकावले, घाबरवले जात आहे. अशी माणसं जर निवडणूक जिंकली तर काय होईल, तुम्हीच विचार करा, असेही भारद्वाज म्हणाले. मी पक्षातील नेत्यांना सांगू इच्छितो की, आपल्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. आपल्याला संजय सिंह, मनीष सिसोदिया आणि केजरीवाल यांच्यासारखं व्हायचं आहे, राजकुमार आनंद नाही, अशी टीकाही त्यांनी केली. (Lok Sabha Election 2024 Rajkumar Anand resigned due to ed raid, said Sanjay Singh, Saurabh Bhardwaj)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -