घरताज्या घडामोडीVoting ID : मतदान करायचं पण Voter ID नाही; काळजी करू नका,...

Voting ID : मतदान करायचं पण Voter ID नाही; काळजी करू नका, आता ही ओळखपत्रही धरणार ग्राह्य

Subscribe

Lok Sabha Election 2024 18 वर्षांवरून युवकांना मतदानाचा हक्क बजावता येतो. मात्र 18 वर्ष पूर्ण झालीत मतदान करायचं, पण मतदान कार्ड नाही. परंतू, आता मतदान कार्ड नसतानाही मतदान करता येणार आहे. कारण मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार कार्डाशिवाय इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे.

मुंबई : कोणत्याही निवडणुकीत मतदान करण्यासाठी Voter ID म्हणजेच मतदार ओळखपत्र असणे गरजेचे असते. मतदार ओळखपत्राशिवाय मतदान करता येत नाही. तसेच, मतदानासाठी वयोमर्यादाही निवडणूक आयोगाकडून घालून देण्यात आली आहे. त्यानुसार, 18 वर्षांवरून युवकांना मतदानाचा हक्क बजावता येतो. मात्र 18 वर्ष पूर्ण झालीत मतदान करायचं, पण मतदान कार्ड नाही. परंतू, आता मतदान कार्ड नसतानाही मतदान करता येणार आहे. कारण मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार कार्डाशिवाय इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. (Voting ID want to Vote but do not have Voter ID Dont worry now this ID will also be accepted by EC)

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, लोकसभा निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे फोटोसह मतदार ओळखपत्र आहे. ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी फोटोसह मतदार ओळखपत्र सादर करतील. पण ज्या मतदारांकडे फोटोसह मतदार ओळखपत्र नाही अथवा ते सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच, प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पोपट सांगतोय उमेदवाराचे भविष्य…मालकाला घेतले ताब्यात

‘ही’ 12 ओळखपत्र धरली जाणार ग्राह्य

 1. पारपत्र (पासपोर्ट)
 2. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
 3. केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र
 4. बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक
 5. पॅन कार्ड
 6. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड
 7. मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र
 8. निवृत्तीवेतनाची दस्तावेज
 9. संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र
 10. आधार कार्ड
 11. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र
 12. कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

दरम्यान, राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर, आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. पंरतू, त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे.

- Advertisement -

सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाणार आहे.

मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना देलेली माहिती-चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रसोबत घेऊन जावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.


हेही वाचा – Election Commission : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही निवडणूक आयोग ठाम; इलेक्शन ड्युटी टाळणाऱ्या शिक्षकांवर कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -