घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : मशीनमध्ये पटापट बटन दाबा, नाहीतर...; अजित पवारांचा मतदारांना...

Lok Sabha 2024 : मशीनमध्ये पटापट बटन दाबा, नाहीतर…; अजित पवारांचा मतदारांना इशारा

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर प्रचार सभांचा धडाका लावला असून ते मतदारांना आश्वासन देण्यात कोणतीही कमतरता सोडत नसल्याचेच पाहायला मिळत आहे. पण आता त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

पुणे : राज्यात लोकसभेच्या प्रचारसभांनी जोर धरला आहे. प्रत्येक पक्षाचे नेते वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन आपापल्या पक्षाचा प्रचार करताना पाहायला मिळाला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर प्रचार सभांचा धडाका लावला असून ते मतदारांना आश्वासन देण्यात कोणतीही कमतरता सोडत नसल्याचेच पाहायला मिळत आहे. मात्र, पुण्यातील एका सभेबाबत मतदारांना त्यांच्या महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Lok Sabha Election 2024 Ajit Pawar warning to voters while speaking at campaign rally)

पुण्यातील एका सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल, पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कोणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जस आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा… म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल, असा इशाराच त्यांच्याकडून मतदारांना देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : उदयनराजेंना उमेदवारी देण्यात वेळ का लागला त्याचे आत्मपरिक्षण करा; भाजपला सवाल कोणाचा?

तसेच, जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी कामे केली आणि करतो आहे. मला काम करायला आवडतात. मला आदेश द्यायची सवय झाली आहे. त्यामुळे मी अधिकाऱ्यांना आदेश देत असतो, पण कार्यकर्त्यांना आदेश द्यायचा नसतो. कार्यकर्त्यांना आदेश दिला तर ते मलाच घरी बसवतील. कार्यकर्त्यांशी नीट बोलावे लागत त्यांना सांभाळावे लागते, असेही यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

तर, जो उमेदवार दिला आहे, तिथल्या आमदार किंवा होऊ घातलेला आमदार असतो त्याला इच्छा असते खासदारांने ढवळाढवळ करू नये. मी 40 वर्ष झाली उमेदवाराला ओळखतो. 40 वर्षांपासून मी ओळखतो ते ढवळाढवळ करणार नाहीत ते बाहेरचे वाटणार नाही ते तुम्हाला आपले वाटतील. मतदान करताना नरेंद्र मोदींचा चेहरा समोर ठेवावा लागेल. पदावर काम करण्याची संधी मिळाली तर पुढच्या 25-50 वर्षाचा विचार करुन काम करा. माझ्या बारामतीत सुद्धा 382 कोटी एवढी मंजुरी देऊ शकलो नाही पण इंदापूरमध्ये दिला आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी महिन्यातून एक दिवस काढेल कामाचा आढावा घेईल. आम्ही जो उमेदवार दिला आहे, तो देखील काम करेल, असे अजित पवारांकडून आश्वस्त करण्यात आले.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : वर्षावर राजकीय बैठक नाहीत, मुख्यमंत्री कार्यालयाचा आयोगाकडे खुलासा


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -