घरदेश-विदेशLok Sabha 2024 : भाजपा जिंकावी ही काँग्रेसचीच इच्छा आहे का?, काय...

Lok Sabha 2024 : भाजपा जिंकावी ही काँग्रेसचीच इच्छा आहे का?, काय म्हणाले गुलाम नबी आझाद

Subscribe

Lok Sabha Election 2024 : पक्ष मजबूत करण्यासाठी काँग्रेस काहीच प्रयत्न करताना दिसत नाही, त्यामुळेच येणाऱ्या निवडणुकीत भाजपाच जिंकून यावी, अशी काँग्रेसची इच्छा आहे का, असा सवाल आझाद यांनी विचारला आहे.

नवी दिल्ली : जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री, पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेता आणि सध्या डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे (डीपीएपी) अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी काँग्रेस काहीच प्रयत्न करताना दिसत नाही, त्यामुळेच येणाऱ्या निवडणुकीत भाजपाच जिंकून यावी, अशी काँग्रेसची इच्छा आहे का, असा सवाल आझाद यांनी विचारला आहे. दोडा येथील प्रचार सभेत ते बोलत होते. (Lok Sabha Election 2024 why ghulam nabi azad said sometimes i feel congress wants bjp to win)

काँग्रेस आणि भाजपाची युती?

काँग्रेस पक्षाची आजची परिस्थिती पाहून अनेकदा असं वाटतं की, काँग्रेसने भाजपासोबत युती केली असावी. कारण पक्षासाठी ज्या गोष्टी करायला हव्या, त्यातली एकही गोष्ट काँग्रेस करत नाही. सध्या पक्ष मजबूत करणे, हे प्राथमिक ध्येय असायला हवे, पण ते देखील पूर्ण होताना दिसत नाही. खरं तर नेतृत्वाने याची जाणीव ठेवून कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यायला हवं, पण तसं होताना दिसत नाही. एकंदरीतच आजच्या काँग्रेस पक्षाची अवस्था पाहता भाजपाच्या विजयामागे हीच करणे असू शकतात, असे परखड मत गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मोदींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर घणाघात

काँग्रेसमधील व्यवस्था बदलण्यासाठी जवळपास 23 नेता प्रयत्न करत होते. मात्र, नेतृत्वाने त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. त्यांनी पक्षातील काही कमतरता समोर आणल्या तेव्हा पक्षश्रेष्ठींचे म्हणणे होते की, हे नेता भाजपाची भाषा बोलत आहेत. त्यामुळेच कधी कधी मला असं वाटतं की, भाजपा जिंकावी ही काँग्रेसचीच इच्छा असावी.

- Advertisement -

बेरोजगारी, महागाई हे निवडणुकीचे प्रमुख मुद्दे

निवडणुका या धर्मावर नाही तर विकासावर लढल्या जातात. आणि आज देशासमोर अनेक प्रश्न आहेत. गरिबी, बेरोजगारी तसेच महागाई हे यातील प्रमुख मुद्दे आहेत. सत्तेत जे पक्ष येतील, त्यांच्यासाठी हेच मुद्दे महत्त्वाचे असतील. त्यांना गरिबी, महागाई आणि बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न करावे लागतील. (Lok Sabha Election 2024 why ghulam nabi azad said sometimes i feel congress wants bjp to win)

ओमर अब्दुल्ला यांच्यावरही टीका

काश्मीरच्या आजच्या परिस्थितीला विघटनवादी मानसिकता कारणीभूत असल्याचा आरोप आझाद यांनी यावेळी केला. अशा मानसिकतेच्या राजकीय नेत्यांमुळेच येथील जवळपास एक लाख लोक मारले गेले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यावरही टीका केली. अब्दुल्ला हे काश्मीरमध्ये पर्यटक म्हणून येत असल्याचे ते म्हणाले. उन्हाळ्यात ते लंडनमध्ये जातात तर थंडीमध्येही ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतात. दरम्यान, उधमपूर येथे 19 एप्रिल, जम्मूमध्ये 26 एप्रिल, अनंतनाग-राजौरी येथे 7 मे, श्रीनगरला 13 मे आणि बारामुल्ला येथे 20 मे रोजी मतदान होणार आहे. (Lok Sabha Election 2024 why ghulam nabi azad said sometimes i feel congress wants bjp to win)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -