घरदेश-विदेशभगवान शंकराचा सिगारेट पेटवतानाचा बॅनर; कन्याकुमारीत नव्या वादाला सुरुवात

भगवान शंकराचा सिगारेट पेटवतानाचा बॅनर; कन्याकुमारीत नव्या वादाला सुरुवात

Subscribe

अलीकडेच चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी सोशल मीडियावर त्यांच्या काली या डॉक्यूमेंट्री फिल्मचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये माँ काली सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे

काली चित्रपटाच्या पोस्टरवरून सुरु झालेला वाद संपत नाही तोवर आता सिगारेट पेटवतानाचा भगवान शंकराचा बॅनर समोर आला आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारीमधून समोर आलेल्या या बॅनरमुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या बॅनरप्रकरणी पोलिसांनी आरोपींना पोलीस ठाण्यात बोलवून कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र या बॅनरमुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाद वाढल्यानंतर अखेर पोलिसांनी बॅनर हटवले आहे. या बॅनरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता हिंदू संघटनांकडून संताप व्यक्त होत आहे.

ही घटना कन्याकुमारी जिल्ह्यातील थिंगल नगरजवळील आरोग्यपुरममधील आहे. काही दिवसांपूर्वी येथे एका जोडप्याचे लग्न झाले. या जोडप्याचे अभिनंदन करण्यासाठी वराच्या मित्रांनी हे बॅनर लावले होते. या मित्रांनी परिसरात दोन ठिकाणी हे बॅनर लावले.

- Advertisement -

एका बॅनरवर जोडप्याचे अभिनंदन करतानाचा मित्रांच्या फोटो आहे, तर दुसऱ्या बॅनरवर जोडप्यासह भगवान शंकराचा सिगारेट पेटवतानाचा फोटो आहे, या बॅनरमध्ये वराची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या बॅनरवर वरासाठी लिहिण्यात आले की, ‘तुम्ही केस छोटे ठेवा, किती छोटे? इतके लहान की तुमची पत्नी त्यांना धरू शकत नाही.

lord shiva framed with cigarette on a banner in kanyakumari tamilnadu after kaali

- Advertisement -

वराच्या मित्रांनी भगवान शंकराचा बॅनर लावताच आता हिंदू संघटनांकडून विरोध दर्शवला जात आहे. तर सोशल मीडियावरही हे बॅनर व्हायरल होत आहे. यानंतर परिसरातील हिंदू संघटनांनी इराणी पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वराच्या मित्रांना पोलीस ठाण्यात बोलावले. मात्र सर्वांना कायदेशीर सुचना देऊन सोडण्यात आले, तर पोलिसांनी संबंधित बॅनरही हटवले आहेत.

lord shiva framed with cigarette on a banner in kanyakumari tamilnadu after kaali

‘काली’च्या पोस्टरवरून वादाला सुरुवात

अलीकडेच चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी सोशल मीडियावर त्यांच्या काली या डॉक्यूमेंट्री फिल्मचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये माँ काली सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. यासोबतच मातेच्या एका हातात एलजीबीटी समुदायाचा रंगीत ध्वजही दाखवण्यात आला होता. हे पोस्टर समोर येताच देशभरात संताप व्यक्त होताना दिसला.

फिल्ममेकर लीना कॅनडामध्ये राहत असून त्या अनेक वर्षांपासून चित्रपट बनवत आहेत. त्यांची डॉक्युमेंट्री फिल्म कॅनडामध्ये दाखवली जाणार आहे. लीना यांच्या मते, त्यांची डॉक्युमेंट्री फिल्म टोरंटोमधील ‘अंडर द टेंट’ प्रोजेक्टचा भाग आहे. लीना यांनी 2 जुलै रोजी सोशल मीडियावर याचे पोस्टर रिलीज केले. पोस्टर समोर आल्यानंतर #ArrestLeenaManimekalai ट्रेंड करत आहे. वाद वाढल्यानंतर कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनीही यावर आक्षेप नोंदवला आहे. भारतीय उच्चायुक्तांनी या डॉक्युमेंट्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.


तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्राचा कायमस्वरूपी विकास आराखडा तयार करणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -