घरCORONA UPDATE१३२ दिवसांनंतर सक्रिय रुग्णसंख्येचा नीच्चांक; सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत घसरण

१३२ दिवसांनंतर सक्रिय रुग्णसंख्येचा नीच्चांक; सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत घसरण

Subscribe

डिसेंबरला देशातील रुग्णसंख्या ४,२८,६४४ इतकी आहे. गेल्या १३२ दिवसांच्या कालावधीनंतर प्रथमच रुग्णसंख्येने नीचांक गाठला आहे. यापूर्वी २३ जुलैला सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ४ लाख २६ हजार १६७ इतकी होती.

जगभरात कोविड १९ ची दुसरी लाट येत असताना भारतातही या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्ली, गोवा, राजस्थान या राज्यांमध्ये दुसरी लाट आली आहे. प्रत्यक्षात मात्र भारतामध्ये सक्रीय कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्याने लक्षणीय घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. २ डिसेंबरला देशातील रुग्णसंख्या ४,२८,६४४ इतकी आहे. गेल्या १३२ दिवसांच्या कालावधीनंतर प्रथमच रुग्णसंख्येने नीचांक गाठला आहे. यापूर्वी २३ जुलैला सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ४ लाख २६ हजार १६७ इतकी होती.

भारतात आता सक्रीय कोविड रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या कोविड बाधित रुग्णसंख्येच्या फक्त ४.५१ टक्के इतकी झाली आहे. देशात नव्याने कोविड संसर्ग होणार्‍या व्यक्तींची संख्या तीन दिवसांपासून सातत्याने ३० हजारांपेक्षा कमी आहे. देशात गेल्या २४ तासांत ३६,६०४ नव्या कोविड बाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये ४३,०६२ जण रोगमुक्त होऊन रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. गेले पाच दिवस बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्याने बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे. कोविड बाधित बरे होण्याचे प्रमाण ९४.०३ टक्क्यांवर पोहोचले आहे. कोविड संसर्गातून पूर्ण बरे झालेल्यांची संख्या ८९,३२,६४७ झाली. रोगमुक्त होणारे आणि नव्याने बाधित यांच्या संख्येतील तफावत दिवसेंदिवस सतत वाढतच असून ८० हजारांचा आकडा पार करून सध्या ही तफावत ८५,०४,००३ इतकी आहे. नव्याने रोगमुक्त झालेल्या कोविड बाधितांपैकी ७८.३५ टक्के रुग्ण देशातील १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत. महाराष्ट्रात एका दिवसांत रोगमुक्त झालेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे ६,२९० इतकी असून त्याखालोखाल केरळमध्ये ६,१५१ तर दिल्लीत ५,०३६ रुग्ण रोगमुक्त झाल्याची नोंद झाली आहे.

- Advertisement -

नोंद झालेल्या नव्या कोविड बाधितांपैकी ७७.२५ टक्के रुग्ण देशातील १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत. यामध्ये केरळमध्ये एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे ५,३७५ व्यक्ती नव्याने कोविड बाधित झाल्याची नोंद झाली, त्याखालोखाल महाराष्ट्रात ४,९३० नव्या रुग्णांची नोंद झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -