घरदेश-विदेशLPG Cylinder Price: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका! मुंबईत घरगुती गॅस सिलेंडर ५५...

LPG Cylinder Price: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका! मुंबईत घरगुती गॅस सिलेंडर ५५ रुपयांनी महागला

Subscribe

ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. कारण पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता घरगुती गॅस सिंलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या वाढत्या किंमती ६ ऑक्टोबर म्हणजे आज जाहीर करण्यात आल्या आहे. त्यानुसार तेल कंपन्यांनी विनाअनुदानित १४.२ किलो सिलेंडरच्या किंमतीत तब्बल १५ रुपयांची वाढ केली आहे.

यामुळे दिल्लीमध्ये विनाअनुदानित घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ८४४.५० रुपयांवरुन ८९९.५० रुपयांवर गेली आहे. तर ५ किलोचा सिलिंडर आता ५०२ रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत ८४४.५० रुपयांचा गॅस सिलेंडर ८९९.५० रुपये झाला आहे. तर कोलकत्तामध्ये हाच सिलेंडर आता ९२६ रुपये आणि चेन्नईत ९१५.५० रुपयांना मिळणार आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता एलपीजी सिलेंडरची किंमत १००० रुपयांवर जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

विनाअनुदानीत १४.२ किलो सिलेंडरच्या किंमती

दिल्लामध्ये सबसिडीविना १४.२ किलोचा सिलेंडर आता ८९९.५० रुपये झाला आहे. तर मुंबईत ८४४.५० रुपयांचा सिलेंडर आता ८९९.५९ रुपये झाला आहे. याशिवाय कोलकत्तामध्ये एलपीजी सिलेंडर ९११ रुपयांवरून ९२६ रुपये झाला आहे. तर चेन्नईत विनाअनुदानित सिलेंडर ९१५.५० रुपये झाला आहे. यापूर्वी हा सिलेंडर ९००.५० रुपये होता.

- Advertisement -

१ ऑक्टोबर रोजी तेल कंपन्यांनी १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर ४३.५ रुपयांपर्यंत वाढ केली होती. मात्र १४.२ किलोचा अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. यापूर्वी १ सप्टेंबरला १४.२ किलोचा विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडर २५ रुपयांनी महागला होता. १८ ऑगस्टला देखील तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांनी वाढ केली होती.

यापूर्वी जुलै आणि ऑगस्टमध्येही गॅस सिंलेंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र मे आणि जूनमध्ये या किंमती स्थिर होत्या. मात्र यापूर्वी जानेवारी, फेब्रुवारीमध्येही या किंमतींमध्ये वाढ झाल्य़ाचे पाहायला मिळाले. तर मार्चमध्ये एलपीजी सिलेंडर ८१९ रुपयांवर जाऊन पोहचला.


Corona Vaccine : Covid-19 लस घेण्यास नकार, तब्बल १४०० कर्मचाऱ्यांची नोकरीवरून हकालपट्टी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -