Lakihmpur Vilolence : शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या भाजपचे उलटे दिवस आलेत, नाना पटोले यांची टीका

प्रियंका गांधी यांना सोडलं नाही तर काँग्रेस जेलभरो आंदोलन करेल आणि याची सर्व जबाबदारी ही केंद्र सरकारची असेल

Nana patole on 12 mla suspension cancelled supreme court decision
कोर्टाचे निर्णय विधिमंडळ आवारात लागू न करण्याचा ठरावच केलाय- नाना पटोले

लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनावर ज्या प्रकारे हल्ला करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना प्रवेश नाकारला, राहुल गांधींना राज्यात येण्याची परवानगी नाकारली यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या भाजपचे उलटे दिवस आले असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे. प्रियंका गांधी यांना सन्मानाने सोडून जनतेची आणि शेतकऱ्यांची माफी मागवी अशी मागणी पटोले यांनी केली आहे. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांचा प्रश्न निकाली लावण्यात यावा अशी मागणी देखील नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे की, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अटक करुन त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. अजूनही त्यांना कोर्टात हजर करण्यात आले नाही. शेतकऱ्यांना संपवणाऱ्या या भाजपला आता लोकंच जागा दाखवतील. प्रियंका गांधी यांना सोडलं नाही तर काँग्रेस जेलभरो आंदोलन करेल आणि याची सर्व जबाबदारी ही केंद्र सरकारची असेल त्यांच्या इशाऱ्यावर योगी सरकार कारवाई करत आहे. असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या चेष्टा करणाऱ्या भाजपचे उलटे दिवस आले आहेत. यामुळे प्रियंका गांधींना ज्या प्रकारे अटक करण्यात आले आहे. त्यानुसार जनतेची माफी मागावी आणि शेतकऱ्यांची देखील माफी मागावी आणि काळ्या कायद्यांचा प्रश्न निकाली लावावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

लोकं भाजपला जागा दाखवतील

महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निकाल हाती येत आहे. यावर नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, लोकशाहीच्या पद्धतीमध्ये पाच वर्षांसाठी लोकं निवडून देतात पण भाजपच्या ओबीसी विरोधी धोरणामुळे या निवडणुका राहिल्या आहेत. भाजपचे शेतकरी विरोधी धोरण असल्याचे स्पष्ट झालं आहे. ओबीसी विरोधी धोरणामुळेच या निवडणुका राहिल्या आहेत. आताच्या निवडणुकांमध्ये जो काही कल सुरु आहे. यामध्ये लोकांनी भाजपला मागे टाकण्याचे काम सुरु केलं आहे. निकाल पुर्ण झाल्यावर येणाऱ्या कलानुसार भाजप मागे पडेल. काँग्रेसला आघाडी मिळाली असल्याचे दिसत आहे. संपुर्ण निकाल आल्यावर काय ते कळेल असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

बच्चू कडू अपक्ष आमदार आहेत. त्यांनी काय बोलाव त्यांनी काय वक्तव्य कराव हा त्यांचा भाग आहे. महाविकास आघाडीचे सरकार आहे. महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आलं आहे. त्यामुळे कोण काय बोलतं याकडे लक्ष देण्याचे कारण नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : देश हुकूमशाहीत, परवानगी नाकारली तरी लखीमपूरला जाणार – राहुल गांधी