घरक्रीडाMPL, My11Circle, Dream11 वादात; सौरव गांगुली, विराट कोहलीला न्यायालयाची नोटीस!

MPL, My11Circle, Dream11 वादात; सौरव गांगुली, विराट कोहलीला न्यायालयाची नोटीस!

Subscribe

ऑनलाईन गेमिंग तसं भारतीयांसाठी नवीन नाही. मात्र, यंदाचा IPL 2020 चा सीजन सुरू झाल्यापासून क्रिकेट आणि अन्य काही खेळांशी संबंधित ऑनलाईन मोबाईल गेमिंग अॅप भलतेच लोकप्रिय होऊ लागले आहेत. त्यापैकी Dream 11 हे तर आयपीएलचं स्पॉन्सरच झालं आहे. अशाच मोबाईल अॅपमध्ये पैसे टाकल्यानंतर ते हरल्यामुळे तमिळनाडूमध्ये तरुणांनी आत्महत्या केल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता या गेमिंग मोबाईल अॅपसोबतच त्यांची जाहिरात करणारे क्रीडापटू देखील अडचणीत आले आहेत. यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयाचं खंडपीठ असलेल्या मदुरै न्यायालयाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णाधार विराट कोहली यांना नोटीस पाठवली आहे. अशा प्रकारच्या फँटसी स्पोर्ट्स अॅप्स (Fantasy Sports Apps) विरोधात आणि त्यांची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटीजविरोधात मदुरै न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. क्रिकट्रॅकरनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

न्यायालयानं विचारला जाब!

एडव्होकेट मोहम्मद रिझवी यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं या फँटसी स्पोर्ट्स अॅप आणि त्यांची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटीजला कडक शब्दांत जाब विचारला आहे. अशा अॅप्सच्या विश्वासार्हतेवर न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘यातले काही अॅप हे चेन्नई सुपर किंग्ज किंवा राजस्थान रॉयल्स अशा आयपीएल टीमच्या नावावरून तयार करण्यात आले आहेत. तर काही अॅप तर विविध राज्यांच्या नावावरून तयार करण्यात आले आहेत. या टीम त्या त्या राज्यांच्या बाजूने खेळतात का?’ असा सवाल न्यायमूर्ती एन. किरूबकारण आणि न्यायमूर्ती बी. पुगालेन्धी यांच्या खंडपीठाने विचारला आहे. या प्रकरणी अशाच दोन मोबाईल अॅपची जाहिरात करणाऱ्या सौरव गांगुली आणि विराट कोहली या दोघांना न्यायालयाने कायदेशीर नोटीस बजावली आहे.

- Advertisement -

सध्या सौरव गांगुली My11Circle या मोबाईल गेमिंग अॅपची तर विराट कोहली Mobile Premier League ची जाहिरात करत आहेत. मात्र, सर्वात महत्त्वाचं म्हणजे असंच एक मोबाईल गेमिंग अॅप असलेल्या Dream 11 ने संपूर्ण आयपीएलचीच स्पॉन्सरशिप घेतली आहे. त्यासोबतच बीसीसीआयने देखील भारतीय क्रिकेट संघाची स्पॉन्सरशिप नुकतीच Nike सोबत करार संपुष्टात आल्यानंतर MPL ला दिली आहे. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर अशा अॅपबाबत न्यायालय नक्की काय निर्णय घेतं, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -