Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमMahakaleshwar Temple : उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात आग, पुजाऱ्यांसह 13 जण होरपळले

Mahakaleshwar Temple : उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात आग, पुजाऱ्यांसह 13 जण होरपळले

Subscribe

भोपाळ : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात भीषण दुर्घटना घडली आहे. येथे भस्म आरतीच्या वेळी होळी खेळत असताना गर्भगृहात आग लागली. या आगीत मंदिरातील पाच पुजाऱ्यांसह 13 जण भाजले. ही बाब लक्षात घेऊन मंदिराचा नंदी हॉल रिकामा करून भस्म आरतीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना बाहेर काढण्यात आले. तसेच याच आगीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा – RBI : क्रेडिट कार्डच्या बिलिंग प्रक्रियेचे नियम आरबीआयने बदलले, ग्राहकांना दिलासा

- Advertisement -

गर्भगृहात आग लागल्याचे लक्षात येताच तेथे उपस्थित भाविकांमध्ये घबराट पसरली, परिणामी चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान, जिल्हा रुग्णालयातून तत्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारानंतर चौघांना इंदूरला रेफर करण्यात आले तर उर्वरित लोकांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेच्या वेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा मुलगा वैभव यादव हे देखील मंदिरात होते.

- Advertisement -

मंदिरात आरती सुरू असताना गुलाल उधळल्याने आग लागल्याचे सांगण्यात येते. पुजारी गर्भगृहात आरती करत असताना मागून कोणीतरी पुजारी संजीव यांच्यावर गुलाल उधळला. गुलाल दिव्यावर पडला. गुलालात काही रसायन असल्याने आग लागल्याचा अंदाज आहे. यावेळी मंदिरात हजारो भाविक महाकालसोबत होळी साजरी करत होते.

हेही वाचा – CJI Chandrachud : ट्रोलिंगचा त्रास मलाही; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची व्यथा

गर्भगृहातील चांदीच्या मुलामा रंगापासून वाचवण्यासाठी फ्लॅक्स लावण्यात आले होते. आगीमुळे त्यानेही पेट घेतला. काही लोकांनी प्रसंगावधान राखत फायर एक्सटिंग्विशरच्या साह्याने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गर्भगृहात आरती करत असलेले संजीव पुजारी, विकास, मनोज, सेवाधारी आनंद, कमल जोशी यांच्यासह 13 जण भाजले.

या आगीत 13 जण भाजले असून त्यापैकी चौघांना इंदूरला रेफर करण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर उज्जैनच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून यासाठी समिती स्थापन करण्यात येत आहे, अशी माहिती उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी दिली.

हेही वाचा – Shivshakti Point: चांद्रयान-3 लँडिंग साइट आता अधिकृतपणे ‘शिवशक्ती पॉइंट’; खगोलशास्त्रीय संघाने दिली मान्यता 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -