घरमहाराष्ट्रनाशिकLok Sabha 2024 : मुख्यमंत्र्यांसमोरच नाशिकच्या हेमंत गोडसेंचे शक्तिप्रदर्शन, शिंदेंकडून शब्द

Lok Sabha 2024 : मुख्यमंत्र्यांसमोरच नाशिकच्या हेमंत गोडसेंचे शक्तिप्रदर्शन, शिंदेंकडून शब्द

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले असले तरी अद्याप महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. अशातच नाशिक लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच काल, रविवारी शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी देखील, निश्चिंत राहा, तुमच्यावर अन्याय होणार नाही, असा त्यांना शब्द दिला. त्यामुळे आता भाजपा काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – RBI : क्रेडिट कार्डच्या बिलिंग प्रक्रियेचे नियम आरबीआयने बदलले, ग्राहकांना दिलासा

- Advertisement -

महायुतीत नाशिकच्या जागेवर शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीच नाशिकमधील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात ही घोषणा केली होती. गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पूर्ण बहुमताने पाठवायचे आहे, असे ते म्हणाले होते. मात्र, स्थानिक पातळीवर भाजपा पदाधिकाऱ्यांचा त्याला विरोध आहे. नाशिक भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीत, पक्षीय बलाबल बघता नाशिकची जागा भाजपाला मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

- Advertisement -

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मागच्या दोन्ही टर्ममध्ये भाजपाला नेहमी दुय्यम वागणूक दिली आहे. परंतु, खासदार श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांच्या नावाची घोषणा करताना महायुतीच्या इतर कोणालाही विचारात का घेतले नाही? असा सवालही भाजपाने उपस्थित केला आहे. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी याबाबत राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे कार्यकर्त्यांची इच्छा बोलून दाखवली. तर आता महायुतीत सहभागी होत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील नाशिकच्या जागेवर दावा केला असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा – Loksabha 2024: भाजपाची पाचवी यादी जाहीर; अभिनेत्री कंगना रणौतला मंडीमधून उमेदवारी

या पार्श्वभूमीवर हेमंत गोडसे यांनी काल, रविवारी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच शक्तिप्रदर्शन केले. ‘नाशिकची जागा शिवसेनेचीच’, ‘धनुष्यबाण रामाचा, हेमंत आप्पा कामाचा’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) दादा भुसे यांनीही हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरला. महायुतीत 7-8 मतदारसंघांचा पेच कायम असून त्यावर चर्चा सुरू आहे. पण निश्चिंत राहा, कोणताही अन्याय होणार नाही. खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठीशी उभे राहा, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे आता भाजपा ही जागा शिंदे गटाकडे सोडेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Politics: काँग्रेसला धक्का; आमदार राजू पारवेंचा शिंदे गटात प्रवेश, रामटेकची जागा लढवणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -