घरदेश-विदेशLive Update : शिवसेनेचे गटनेते अजय चौधरींची मान्यता रद्द

Live Update : शिवसेनेचे गटनेते अजय चौधरींची मान्यता रद्द

Subscribe

एकनाथ शिंदे यांच्या गटनेते पदाला विधी मंडळाची मान्यता

सूनील प्रभूंचेही मुख्य प्रतोद पद रद्द

- Advertisement -

शिवसेनेचे गटनेते अजय चौधरींची मान्यता रद्द


ओबीस आरक्षणाबाबत कमा जवळपास पूर्ण – भुजबळ

- Advertisement -

39 आमदारांनी व्हीपविरोधात मतदान केले

39 आमदारांवर कारवाईची मागणी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.

व्हिप विरोधात मतदान करणाऱ्या 39 जणांना अपात्र ठरवावे-  अरविंद सावंत


5 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना इडीचे समन्स


विश्वासमताचा प्रस्ताव बहुमताने पारित होईल – देवेंद्र फडणवीस

पर्यावरणवाद्यांशी बोलून त्यांची समजूत काढू – देवेंद्र फडणवीस

आरेमध्ये नव्याने झाडे कापली जाणार नाहीत – देवेंद्र फडणवीस


राष्ट्रवादीच्या नेत्यांची संध्याकाळी 6 वाजता बैठक


विधानसभेची बैठक स्थगित, सोमवारी ११ वाजता होणार कामकाज सुरु


शिवसेना मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून पत्र प्राप्त, भरत गोगावले यांच्या पत्राप्रमाणे शिवसेना विधिमंडळाच्या पक्षातील १६ सदस्यांनी पक्षादेशाच्या विरोधात मतदान केले आहे याची नोंद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंद घेतली आहे.


काँग्रेसच्या वतीने राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन – नाना पटोले


नार्वेकरांना अध्यक्षपद मिळालं यात थोडा माझाही त्याग – मुनगंटीवार

नार्वेकर हे आदित्य ठाकरेंच्या गुरुस्थानी- मुनगंटीवार

जावई हा देवासमान असतो- मुनगंटीवार


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत याचे दु:ख – सुनील प्रभू

विधानसभा अध्यक्षपदी सर्वात तरुण व्यक्तीमत्व,

नियतीचे वारे कधीही फिरू शकतात

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत याचे दु:ख – सुनील प्रभू


पहिल्या लाईनमध्ये आमचीच मंडळी- अजित पवार

महाराष्ट्राच्या विकासाची चाक गतीशील होतील, सर्व अध्यक्षांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला – अजित पवार

मोदींच्या लाटेत नार्वेकरांचा पराभव झाल्याची आठवण

नार्वेकरांना कायद्याचं चांगल ज्ञान आहे-  पवार

तरुण आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सभागृहाला लाभले

नार्वेकर कुटुंबियांना मोठी राजकीय पार्श्वभूमी


विधिमंडळात जावई- सासऱ्याचे वर्चस्व- फडणवीस


राहुल नार्वेकर देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष- देवेंद्र फडणवीस


राहुल नार्वेकर  यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड


विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार राहुल नार्वेकर विजयी

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि एमआयएम तटस्थ

नार्वेकरांनी १६४ आकडा केला पार

सपा आणि एमआयएमची तटस्थ भूमिका


विरोधी आमदारांनी ED, ED च्या घोषणा दिल्या, पाहा व्हिडिओ

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान विरोधी आमदारांनी ‘ईडी, ईडी’च्या घोषणा दिल्या.


भाजपचे राहुल नार्वेकर विजयी, शिंदे गटाकडून नार्वेकरांच्या बाजूने मतदान


भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना 164 मते


शिंदे गटाचे शिवसेनेच्या व्हीपविरोधात मतदान

गुलाबराव पाटील, दादा भुसे, सांदिपान भूमरे यांचे भाजपच्या उमेदवाराला मतदान


विधानसभा अध्यक्षपदासाठी मतमोजणी सुरु, शीरगणतीद्वारे मतमोजणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत यांच्याकडून भाजपच्या राहुल नार्वेकरांना मतदान


राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात यावी, चंद्रकांत पाटलांचा प्रस्ताव


विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात


बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस आमदारांना बजावला व्हीप


विधानभवानात काँग्रेसची बैठक सुरु


शिंदे गटातील आमदार फेटे बांधून विधानभवनात दाखल


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल


विधानभवनात जाण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांकडून बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन


१६२ पेक्षा जास्त मत मिळतील, नार्वेकर सत्याच्या बाजूने उभे आहेत – सुधीर मुनगंटीवार


आजपासून शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं दोन दिवशीय अधिवेशन, या अधिवेशनात ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. तसेच अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडणुक पार पडणार आहे, या अध्यक्षपदासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान शिवसेनेकडून एकनाथ शिंदे गटाला व्हिप जारी करण्यात आला आहे. मात्र शिवसेनेचा हा व्हीप लागू होत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे अधिवेशनात शिवसेनेच्या व्हिपवरूनही राजकारण रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान या अधिवेशनासाठी आता शिंदे समर्थक आमदार काल गोव्याहून मुंबईत दाखल झाले आहे.  हॉटेल ताज प्रेसिडेन्सीत शिंदे गटातील आमदार आणि भाजपच्या आमदारांची एकत्रित बैठक झाली. यावेळी आमदारांना विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -