घरदेश-विदेशLive Update: मुंबईत गेल्या २४ तासांत ५२७ नव्या रुग्णांची वाढ, ६ जणांचा...

Live Update: मुंबईत गेल्या २४ तासांत ५२७ नव्या रुग्णांची वाढ, ६ जणांचा मृत्यू

Subscribe

गेल्या २४ तासांत मुंबईत ५२७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४२ हजार ५३८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार १०३ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख १९ हजार २१८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ४ हजार ७२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

दिल्लीत गेल्या २४ तासांत ४१ नव्या रुग्णांची वाढ झाली असून २२ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच एकाही मृत्यूची नोंद झाली नाही आहे. सध्या दिल्लीत ३९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

अँटीनार्कोटिक सेलच्या वांद्रे युनिटने एका पत्रकारासह दोन अंमली पदार्थ तस्करांना वांद्र्यातून अटक केली आहे. यांच्याकडून ६८ लाख रुपये किमतीचे २२५ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझेंची हाऊस कस्टडी याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. वाझेंना घरचे जेवण देण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.


नाशिकमधील पूरपरिस्थितीची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यात मनुष्यहानी झाली नसल्याची माहिती भुजबळांनी दिली. तसेच चार-पाच जनावरांचा मृत्यू झाला आहे. पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


आनंदराव अडसूळ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच ईडी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे, ईडीचे एक अधिकारी रुग्णालयातच हजर


शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीचा समन्स, ४ ऑक्टोबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश


भाजपासारखी आम्ही फोडाफोडी केली नाही, गोव्यात सेना लढणार, गोव्यात शिवसेना २२ जागा लढवणार, ३ दिवस शिवसेना नेते गोव्यात, भाजपाकडून कॅसिनोला समर्थन- संजय राऊत


लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे पुरस्थिती, एनडीआरएफचे रेक्स्यू ऑपरेशन सुरु


बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात पुढील ४८ तासांत गुलाब चक्रिवादळाच्या राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे. तसेच येत्या २४ तासात मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -