Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश मोदींच्या विरोधात ममता बॅनर्जी वाराणसीतून लढण्याचे संकेत

मोदींच्या विरोधात ममता बॅनर्जी वाराणसीतून लढण्याचे संकेत

Related Story

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रचाराने अधिकच धार पकडली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमधील नेत्यांमधील शाब्दिक चकमकी कमालीच्या वाढल्या आहेत. या चकमकींमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीत त्यांना आव्हान देण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. २०२४ मध्ये होणार्‍या निवडणुकीत मोदींना आव्हान उभे करण्याचे संकेत पक्षाने दिले आहेत. त्यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ममता बॅनर्जी असा तगडा सामना पाहायला मिळेल असे दिसते.

टीएमसीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे ट्विट करण्यात आले आहे. त्यात त्यांनी ममता बॅनर्जी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे. ममता नंदीग्राममधून विजयी होत आहे. त्यामुळे त्यांनी दुसर्‍या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा प्रश्नच येत नाही. पश्चिम बंगालमधील नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख कधीच निघून गेलीय. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही सुरक्षित मतदारसंघाचा शोध घ्या.

- Advertisement -

कारण आता वाराणसीत आव्हान दिले जाईल, असे ट्विट टीएमसीच्या अधिकृत हँडलवरून करण्यात आले आहे. टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी थेट भाष्य करून भाजपच्या तंबूत खळबळ उडवून दिली आहे. दुसर्‍या मतदारसंघातून निवडणूक लढत आहे? पंतप्रधानजी, त्या निवडणूक लढणार आहेत. पण ती निवडणूक वाराणसीत होईल. त्यामुळे जा आणि कामाला लागा, असा चिमटा मोईत्रा यांनी काढला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी या वाराणसीतून लढणार असल्याच्या चर्चांना हवा मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी पार पडलेल्या रॅलीत त्यांनी ममता यांना उद्देशून निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी ममता बॅनर्जी दुसर्‍या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत अशी अफवा आहे. त्यात किती तथ्य आहे हे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट करावे, असे म्हटले होते. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव अटळ असल्याचे मोदींना म्हणायचे होते. मोदींच्या वक्तव्यानंतर टीएमसीनेही हे ट्विट करून थेट मोदींनाच आव्हान दिले आहे.

- Advertisement -

वाराणसीत स्वागतच
टीएमसीच्या ट्विटला भाजपनेही तसेच उत्तर दिले आहे. ममतादीदींचे आम्ही वाराणसीत स्वागतच करू. तुमच्या विरोधात आम्ही लोकशाही पद्धतीने लढू. तुम्हाला बाहेरील व्यक्ती म्हणून हिणवले जाणार नाही. तुमच्या कोणत्याही कार्यकर्त्याची हत्या केली जाणार नाही. फाशी दिली जाणार नाही, असे भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष यांनी म्हटले आहे.

- Advertisement -