घरदेश-विदेशसोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीदरम्यान दोन डॉक्टर, एक रुग्णवाहिका सज्ज

सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीदरम्यान दोन डॉक्टर, एक रुग्णवाहिका सज्ज

Subscribe

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज सुमारे दोन तास चौकशी केली. सोनिया गांधी यांची प्रकृती ध्यानी घेऊन ईडीने वैद्यकीय मदतीची सज्जता ठेवली होती.

- Advertisement -

नॅशनल हेराल्डप्रकरणी गांधी कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. जून महिन्यात सलग तीन दिवस राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली. सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची चौकशी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर त्यांना २१ जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज त्या दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर झाल्या. त्यांची २ तास २० मिनिटे चौकशी करण्यात आली.

हेही वाचा – आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

- Advertisement -

यावेळी त्यांची प्रकृती विचारात घेऊन ईडीने कार्यालयाबाहेर दोन डॉक्टर आणि एक रुग्णवाहिका सज्ज ठेवली होती. याशिवाय, त्यांची कन्या प्रियंका गांधी यांना ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्यांनी दोन वेळा सोनिया गांधींची भेट घेतली. सोनिया गांधी यांना साधारणपमे २५ प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर त्यांनी औषधोपचारासाठी घरी जाण्याची परवानगी मागितली असता, ईडीने ते मान्य केले आणि त्यांना पुन्हा २५ जुलै रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात येण्यास सांगितले, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली.

काँग्रेसची देशभर निदर्शने
ईडी चौकशीविरोधाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रासह देशातील काही भागांत काँग्रेसने आंदोलन केले. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली.

हेही वाचा – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरतायत का?

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -