घरदेश-विदेशमहाराष्ट्रातून यूपीमध्ये मजूराची सायकलवारी; ३५० किमीचा केला प्रवास आणि झाला मृत्यू

महाराष्ट्रातून यूपीमध्ये मजूराची सायकलवारी; ३५० किमीचा केला प्रवास आणि झाला मृत्यू

Subscribe

मध्य प्रदेशातील बरवानी येथे आपल्या घरी परतत असताना एका मजूराचा मृत्यू

कोरोनाव्हायरस संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात मजुरांनी हजारो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून किंवा पायी प्रवास करुन आपलं घर गाठल्याच्या अनेक बातम्या समोर आल्यात. दरम्यान मध्य प्रदेशातील बरवानी येथे आपल्या घरी परतत असताना एका मजूराचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मजूराचे नाव तबरक अन्सारी असे असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी होता आणि महाराष्ट्रातील भिवंडी येथे नोकरी करण्यास होता. दोन दिवसांपूर्वी त्याने दहा मजुरांसह सायकल चालवून महाराष्ट्रातून आपल्या मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता.

भिवंडीतील पॉवर-लूम युनिटमध्ये प्रत्येकाची नोकरी लॉकडाऊनमुळे गेली. आमच्याकडे घरी जाण्याशिवाय कोणताही मार्ग नव्हता, असे एका मजुराने सांगितले. तसेच आमच्याकडे पैसे नव्हते किंवा कोणते अन्न नव्हते, म्हणून आम्ही सायकलवरून उत्तर प्रदेश येथे जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा आम्ही सायकलवरून 350 किलोमीटर पोहोचले त्यादरम्यान तबरकची तब्येत अचानक बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

दरम्यान, जास्त थकवा, डिहायड्रेशन आणि उष्माघात हे मृत्यूचे कारण असू शकते असे पोलिसांचे म्हणणे आहे. मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टम अहवालातून स्पष्ट होईल, असे देखील सांगण्यात येत आहे. 21 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील वकिल श्रावस्ती आपल्या घरी जाण्यासाठी पायी प्रवास करत निघाला होता. सीमा ओलांडताच त्याचा मृत्यू झाला. तर 28 एप्रिल रोजी, 45 वर्षांचा बळीराम देखील आपल्या घरी दुसऱ्या राज्यात प्रवास करत असताना मरण पावला. त्या दोघांना ही दम्याचा त्रास होता आणि ते दोघं बरवानी येथील रहिवासी होते.


LockDown: ९ दिवसांत ९०० किमी मजूरांची चंदिगड ते उत्तरप्रदेश पायीवारी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -