घरदेश-विदेशMocha Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा वेग वाढला; 'या' राज्यांना अलर्ट

Mocha Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा वेग वाढला; ‘या’ राज्यांना अलर्ट

Subscribe

नवी दिल्ली : आग्नेय बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ वेगाने पुढे सरसावले असून कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाल्यामुळे आज चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मोचा (Mocha Cyclone) बंगालच्या हवामानावर तसेच संपूर्ण उत्तर भारतावर परिणाम करणार असल्यामुळे अनेक राज्यांना अलर्ट दर्शविण्यात आला आहे.

मोचा चक्रीवादळ हे वर्षातील पहिले चक्रीवादळ असल्यामुळे जागतिक हवामान संघटनेने (WMO) या संभाव्य वादळाला ‘सायक्लोन मोचा’ असे नाव दिले आहे. या चक्रीवादळामुळे पुढील तीन दिवस जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ग्लोबल फोरकास्ट सिस्टम (GFS) मॉडेलने म्हटले की, मोचा 12 मे पर्यंत उत्तर, ईशान्य आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत प्रवास करेल. मे 2020 मध्ये सुपर चक्रीवादळ ‘अम्फान’ने कोलकात्यासह जवळजवळ संपूर्ण दक्षिण बंगालला उद्ध्वस्त केले होते.

- Advertisement -

सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला
हवामान विभागाकडून मच्छिमारांना आग्नेय बंगालच्या उपसागरात 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशारा  देण्यात आला आहे. याशिवाय या परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय मध्य बंगालच्या उपसागरातील लोकांना ९ मे पूर्वी सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आजपासून पुढील चार दिवस अंदमान आणि निकोबार बेटांजवळ पर्यटन, ऑफशोअर क्रियाकलाप आणि शिपिंगचे नियमन करण्यात यावे, असेही हवामान विभागाकडून सुचवण्यात आले आहे.

चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी अनुकूल परिस्थिती
Windi.com कडून बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थितीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किलोज्युल हे ऊर्जा मोजण्याचे एकक आहे. ही उष्णता क्षमता समुद्राच्या वरच्या थरांमध्ये ‘संचयित’ होऊ शकणार्‍या उष्णतेचे प्रमाण दर्शवते. अभ्यासानुसार 60 किलोज्युल प्रति चौरस सेंटीमीटरपेक्षा जास्त उष्णता क्षमता उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांची तीव्रता वाढवू शकते. सध्या बंगालच्या उपसागरावर उष्ण कटिबंधीय चक्रीवादळाची उष्णता क्षमता 100 किलोज्युल्स (kJ/cm) प्रति चौरस सेमी असल्यामुळे चक्रीवादळ तयार होऊ शकते.

- Advertisement -

अल निनोची स्थिती होणार निर्माण!
जागतिक हवामान संघटनेच्या मते या वर्षी मे-जुलै दरम्यान अल निनो विकसित होण्याची 60 टक्के शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर जून-ऑगस्टमध्ये 70 टक्के आणि जुलै-सप्टेंबर दरम्यान 80 टक्केपर्यंत अल निनोमध्ये वाढ होणार आहे. अल निनोचा सरासरी दर 2 ते 7 वर्षांनी येतो आणि 9 ते 12 महिने टिकतो. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सांगितले की, पावसाळ्यात अल निनोची स्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याचा परिणाम मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात जाणवणार आहे. या अंदाजामुळे कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे.

अनेक राज्यांमध्ये अलर्ट
पुढील पाच दिवस अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे देशातील बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून उत्तराखंड, हिमाचल, पंजाब, राजधानी दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि उत्तर पश्चिम भारताच्या भागांसह देशाच्या अनेक भागांमध्ये पाऊस आणि गारपीट होऊ शकते. ओडिशा, तामिळनाडू, पी. बंगाल, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकलमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयातही पुढील पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दिल्लीत धुळीचे वादळ
रविवारी दिल्लीच्या अनेक भागात धुळीचे वादळ आणि हलका पाऊस झाला. त्यामुळे तापमानाचा पारा ३७.४ अंश सेल्सिअसवर पोहोचला असून, सरासरीपेक्षा दोन अंशांनी कमी आहे. दिल्लीचे किमान तापमान 21.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा चार अंशांनी कमी आहे. हवामान विभागाने आज आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवली असून 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -