घरदेश-विदेशमोदी सरकार आज ट्रिपल तलाकचे नवे विधेयक सादर करणार

मोदी सरकार आज ट्रिपल तलाकचे नवे विधेयक सादर करणार

Subscribe

ट्रिपल तलाकच्या पहिल्या विधेयकावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर मोदी सरकारतर्फे आज नवे विधेयक सादर केले जाणार आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. आज भाजपने व्हिप जारी करुन आपल्या सर्व खासदारांना ट्रिपल तलाक बिलाच्या चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे. मुस्लिम महिला (लग्नाचे सरंक्षण आणि हक्क) अधिनियम, २०१८ हे बिल आज लोकसभेत येण्याची शक्यता आहे. कारण याच वर्षी सप्टेंबर महिन्यात मोदी सरकारने ट्रिपल तलाकचा अध्यादेश पारित केला होता. त्यामुळे या अधिवेशनात हे बिल पास होणे गरजेचे आहे. कारण अध्यादेश काढल्यानंतर त्याचे सहा महिन्याच्या आत विधेयकात रुपांतर करावे लागते. तसेच जर अधिवेशन सुरु असेल तर ४२ दिवसांच्या आत अध्यादेशाला विधेयकात रुपांतरीत करावे लागले, अन्यथा अध्यादेश रद्द करावा लागतो.

हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबर पासून सुरु झालेले आहे. जर सभागृहात विधेयक पास होऊ शकले नाही, तर पुन्हा अध्यादेश काढण्याचा अधिकार सरकारला आहे. मोदी सरकारने काही काळापूर्वीच ट्रिपल तलाकसंबंधी अध्यादेश काढला होता. लोकसभेत ट्रिपल तलाकचे विधेयक पारित करण्यात आले होते. मात्र राज्यसभेत ते पारित होऊ शकले नाही. राज्यसभेत सत्ताधाऱ्यांचे बहुमत नाही आणि विरोधकांनी या बिलातील तरतुदींना विरोध केल्यामुळे हे विधेयक तिथे अडकलेले आहे.

- Advertisement -

राज्यसभेतील विरोधकांनी या विधेयकावर आक्षेप घेत काही बदल सुचवलेले आहेत. मात्र विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील कोंडी फुटू न शकल्यामुळे हे विधेयक बारगळले होते. आता पुन्हा एकदा मोदी सरकार नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. जर हे नवीन विधेयक आज लोकसभेत पास झाल्यास जुने बिल आपोआपच निकालात निघेल.

ट्रिपल तलाक कायदा होणारच – मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ डिसेंबर रोजी म्हणाले होते की, केंद्र सरकार ट्रिपल तलाकचे विधेयक आणण्यासाठी पुर्ण प्रयत्न करणार आहे. त्यासाठी संसदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत. “मुस्लिम महिलांनी हज यात्रा करावी, पण त्यासोबत त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकारही मिळायला हवेत”, अशी प्रतिक्रियाही मोदी यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -