घरदेश-विदेशअखेर कमलनाथ यांनी त्या वक्तव्यावर मागितली माफी

अखेर कमलनाथ यांनी त्या वक्तव्यावर मागितली माफी

Subscribe

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी अखेर भाजपच्या नेत्या इमरती देवी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माफी मागितली आहे. कमलनाथ म्हणाले की, जर आपलं वक्तव्य कोणाला आक्षेपार्ह वाटलं असेल तर आपण माफी मागतो. जर कोणालाही माझं वक्तव्य अनादर करणारं वाटलं असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. ग्वाल्हेरच्या डबरा मतदारसंघातून भाजपने इमरती देवी यांना उमेदवारी दिली आहे. येथील काँग्रेस उमेदवार हे साधे असून, इमरती देवी यांच्यासारखे ‘आयटम’ नाहीत, असे वक्तव्य रविवारी येथे एका निवडणूक प्रचारसभेतील भाषणात कमलनाथ यांनी केले होते. त्यानंतर कमलनाथ यांच्यावर सडकून टीका करणार आली.

काय म्हणाले कमलनाथ

भाजपाला आपला पराभव होणार असल्याची जाणीव झाली आहे. यामुळेच मूळ मुद्द्यांवरुन जनतेला भरकटवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना जे काही म्हणायचं आहे ते बोलू देत, मी त्यांना यश मिळू देणार नाही. ते म्हणतात मी अनादर करणारं वक्तव्य केलं…कोणतं वक्तव्य? पण जर कोणाला तसं वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. कमलनाथ यांनी मध्य प्रदेशच्या मंत्री इमरती देवी यांना उद्देशून ‘आयटम’ शब्द वापरल्यानंतर हा सगळा वाद सुरु झाला. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे सोमवारी स्पष्टीकरण मागितलं. आयोगाने हे प्रकरण आवश्यक त्या कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडेही पाठवले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

‘दौरे बंद करा, तात्काळ मदत करा, अन्यथा रस्त्यावर उतरू’; दरेकरांचा सरकारला इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -