घरअर्थजगतमुकेश अंबानींनी जिओच्या संचालकपदाचा दिला राजीनामा, आकाश अंबानी यांची अध्यक्षपदी नियुक्ती

मुकेश अंबानींनी जिओच्या संचालकपदाचा दिला राजीनामा, आकाश अंबानी यांची अध्यक्षपदी नियुक्ती

Subscribe

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (mukesh ambani) यांनी जिओ टेलिकॉमच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (mukesh ambani) यांनी जिओ टेलिकॉमच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचाजागी आता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांना जिओच्या (reliance jio) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. (mukesh ambani resigns as director of reliance jio akash ambani chairman)

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या बोर्डाने आकाश अंबानी यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. दरम्यान, जिओ ही देशातील आघाडीची 4G दूरसंचार सेवा प्रदाता आहे. कंपनीने हा बदल सेबीलाही कळवला आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या नेतृत्वात बदलाबाबत बोलले होते. मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवे नेतृत्व पुढे आणावे लागेल, असे ते म्हणाले होते. त्यावेळीही त्यांना जिओची कमान नव्या पिढीकडे सोपवायची आहे, अशी अटकळ होती. मात्र, त्यानंतर त्यांनी या बदलाची कालमर्यादा सांगितली नाही.


हेही वाचा – त्यांनी संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करावीत, एकनाथ शिंदेंचं शिवसेनेला आव्हान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -