घरदेश-विदेशMukhtar Ansari : अवधेश राय हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा; ३२ वर्षे जुने प्रकरण

Mukhtar Ansari : अवधेश राय हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा; ३२ वर्षे जुने प्रकरण

Subscribe

 

वाराणसीः अवधेश राय हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने गॅंगस्टर Mukhtar Ansari ला आजन्म कारावास व एक लाख रूपये दंडाची शिक्षा सोमवारी ठोठावली. विशेष न्यायाधीश अवनीश गौतम यांनी हा निकाल दिला.

- Advertisement -

ही घटना ३ ऑगस्ट १९९१ रोजी घडली होती. माजी आमदार अजय राय यांचा भाऊ अवधेश रायची त्याच्या घराबाहेर गोळी घालून हत्या करण्यात आली. याप्रकरणी Mukhtar Ansari, माजी आमदार अब्दुल कलाम, भीम सिंह, कमलेश सिंह व राकेश न्यायिक यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. विशेष न्यायाधीश अवनीश गौतम यांच्यासमोर याचा खटला चालला. Mukhtar Ansari दोषी नसल्याचा ४१ पानी लेखी युक्तिवाद Adv श्रीनाथ त्रिपाठी यांनी न्यायालयात सादर केला होता. ही घटना केव्हा घडली याची माहिती देणाऱ्या साक्षीदारावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले होते. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला होता. आज निकाल देताना न्यायालयाने Mukhtar Ansari ला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. Mukhtar Ansari ने न्यायालयाला पत्र लिहिले आहे. कारागृहात जीवाला धोका आहे. त्यामुळे सुरक्षा द्यावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.

एप्रिल महिन्यातही हत्येप्रकरणी अन्सारी बंधूंना झाली शिक्षा

अपहरण आणि हत्येप्रकरणी गाझीपुर MP-MLA कोर्टाने गॅंगस्टर Mukhtar Ansariला दहा वर्षांची शिक्षा व पाच लाख रुपयांचा दंड  ठोठावला आहे. तर मुख्तारचा भाऊ बहुजन समाज पार्टीचा खासदार अफजालला न्यायालयाने ४ वर्षांची शिक्षा व एक लाखाचा दंड ठोठावला आहे. मुख्तार सध्या बांदा कारागृहात आहे. त्याला व्हिडिओ कॉन्फेरेंसिगद्वारे खटल्यासाठी हजर करण्यात आले होते. तर अफजाल स्वतः न्यायालयात हजर होता. अफजालला न्यायालयाने ४ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने लोकप्रतिनिधाला दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा ठोठावल्यास त्याचे पद रद्द होते. या नियमामुळे अफजालची खासदारकी जाण्याची शक्यता आहे. न्यायालायने शिक्षा ठोठावल्यानंतर अफजालला गाजीपुर कारागृहात पाठवण्यात आले. विशेष न्यायालयाच्या या निकालाला ३० दिवसांच्या आत अफजाल उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो. भाजपचे माजी आमदार कृष्णानंद राय यांची २००५ मध्ये हत्या करण्यात आली होती. २००७ मध्ये याचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्याआधी विश्व हिंदू परिषदचे पदाधिकारी नंदकिशोर रोंगता यांचे अपहरण व हत्येचा मुख्तार आणि अफजालवर आरोप होता. हे प्रकरण १९९६ मध्ये घडले होते. या खटल्याची सुनावणी १ एप्रिल २०२३ रोजी पूर्ण झाली. न्यायालयाने शनिवारी याचा निकाल जाहिर केला. त्यात अन्सारीला दोषी धरत दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.

- Advertisement -

मुख्तारच्या मुलाला ईडीकडून अटक

अन्सारीचा मुलगा आमदार अब्बास अन्सारी याला ईडीने गेल्या वर्षी अटक केली. अटकेपूर्वी ईडीने त्याची प्रयागराज कार्यालयात चौकशी केली. तब्बल 9 तास ईडीने चौकशी केली. मुख्तार अन्सारी यांच्या विरोधात नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशीसाठी अब्बास अन्सारी याला बोलावले होते. मुख्तारचा भाऊ अफजल अन्सारीचा जबाब नोंदवल्यानंतर अब्बास अन्सारीच्या दुसऱ्या फेरीची चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीनंतर त्याला अखेर अटक करण्यात आली.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -