घरदेश-विदेशनेफ्यू रिओंनी पाचव्यांदा घेतली नागालॅंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

नेफ्यू रिओंनी पाचव्यांदा घेतली नागालॅंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Subscribe

नेफ्यू रिओ यांनी सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर वाई पॅटन यांनी उप मुख्यमत्री म्हणून शपथ घेतली. तसेच जी काइतो, जॅकब झिमोमी, केजी केन्ये, पी पैवांग कोन्याक, मेत्सुबो जमीर, तेमजेन इम्ना अलॉन्ग, सीएल जॉन, सलहौतुओनुओ क्रुसे आणि बाशांममोंगबा चांग या नऊ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात दोन महिलांना स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे नागालॅंड विधानसभेत कोणताही विरोधी पक्ष नसणार आहे.

नवी दिल्लीः नॅशनलल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टीचे नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्त्वात नागालॅंडमध्ये सरकार स्थापन झाले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा मंगळवारी पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा उपस्थित होते.

नेफ्यू रिओ यांनी सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर वाई पॅटन यांनी उपमुख्यमत्री म्हणून शपथ घेतली. तसेच जी काइतो, जॅकब झिमोमी, केजी केन्ये, पी पैवांग कोन्याक, मेत्सुबो जमीर, तेमजेन इम्ना अलॉन्ग, सीएल जॉन, सलहौतुओनुओ क्रुसे आणि बाशांममोंगबा चांग या नऊ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात दोन महिलांना स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे नागालॅंड विधानसभेत कोणताही विरोधी पक्ष नसणार आहे.

- Advertisement -

नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी- भाजप युतीला ६० पैकी ३७ जागा मिळाल्या आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सात उमेदवार निवडून आले आहेत. एवढचं काय तर राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला असल्याचे बोलले जात आहे. तर रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. त्यांचा अजून एक उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस व रामदास आठवले यांचे उमेदवार नागालॅंडमध्ये निवडून आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. रामदास आठवले यांनी तर थेट सत्तेत वाटा मागितला आहे. आमचा पाठिंबा एनडीएला असणार आहे. आम्ही सत्तेत वाटा मागणार आहोत. यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटणार आहे, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली होती.

नागालॅण्डमध्ये महिला आमदार सलहौतुओनुओ क्रूसे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. नागालॅण्डमधील त्या पहिल्याच महिला मंत्री आहेत. त्यावेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. उद्याच्या (बुधवार) महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या घटनेला विशेष महत्त्व आहे. पण नागालॅण्डसारख्या राज्याला जे जमले ते महाराष्ट्राला जमलेले नाही. राज्यात सत्तांतर होऊन आठ महिने झाले तरी, अद्याप मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान मिळालेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -