घरCORONA UPDATEनागपूर पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला 'कुछ कुछ होता है' चित्रपटाचा फोटो कारण...

नागपूर पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाचा फोटो कारण…

Subscribe

कोरोनाच्या जनजागृतीसाठी नागपूर पोलिसांनी १९९८ साली आलेल्या कुछ कुछ होता है चित्रपटाचा आधार घेतला आहे.

कोरोनापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी पोलीस २४ तास ऑन ड्यूटी असतात. आपला जीव धोक्यात घालून ते नागरिकांच संरक्षण करतात. पण तरीही लोकं घराबाहेर पडतात. शिवाय घराबाहेर पडल्यावर सोशल डिस्टन्सिंगचं पालनही ते करत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी नागरिकांना दक्ष करण्याचं काम हे पोलिस करतात. यासाठी वेगवेगळ्या शकलाही ते लढवतात. कधी पोलिसच कोरोनाचा वेश घालून रस्त्यावर येतात. तर कधी गाणी म्हणून लोकांमध्ये जनजागृती करतात. आता पोलिसांनी एक भन्नाट ट्विट करत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या जनजागृतीसाठी नागपूर पोलिसांनी १९९८ साली आलेल्या कुछ कुछ होता है चित्रपटाचा आधार घेतला आहे. या चित्रपटातील फोटो शेअर करत त्यांनी मास्कच महत्त्व लोकांना पटवून दिलं आहे. चित्रपटातील हा फोटो पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या चित्रपटातील एक दृश्य म्हणजे ज्यात शाहरूख खानने काजोलला जवळ घेतले आहे. आणि दुसरीकडे राणी मुखर्जीचा हात धरला आहे.

पोलिसांनी हे ट्विट शेअर करताना लिहिले आहे की, हे बॉण्ड कधीच तुटू देऊ नका … कारण बरेच काही घडते.” लोकांना मास्क घालणे बंधनकारक केले होते. जर तुम्ही मास्क घालून बाहेर नाही पडलात तर बरच काही होऊ शकतं.

- Advertisement -

हे ही वाचा – केरळमध्ये पुन्हा कोरोनाचे संकट, आठवडयाभरात ३०० पेक्षा जास्त रुग्णांची वाढ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -