घरदेश-विदेशमोदींचा आज भव्य रोड शो; राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करणार शक्तिप्रदर्शन

मोदींचा आज भव्य रोड शो; राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करणार शक्तिप्रदर्शन

Subscribe

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्ली येथील एनडीएमसी कन्वेंशन सेंटरमध्ये सोमवार व मंगळवारी बैठक होणार आहे. बैठकीच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ४ वाजता बैठक सुरु होणार आहे. त्याआधी दुपारी ३ वाजता हा रोड शो सुरु होईल. संसद मार्ग येथील पटेल चौकाला फेरी मारुन जय सिंह रोड जंक्शनवर पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोची सांगता होईल.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज दिल्ली येथे भव्य रोड शो होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दिल्ली वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत.

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्ली येथील एनडीएमसी कन्वेंशन सेंटरमध्ये सोमवार व मंगळवारी बैठक होणार आहे. बैठकीच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ४ वाजता बैठक सुरु होणार आहे. त्याआधी दुपारी ३ वाजता हा रोड शो सुरु होईल. संसद मार्ग येथील पटेल चौकाला फेरी मारुन जय सिंह रोड जंक्शनवर पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोची सांगता होईल.

- Advertisement -

या रोड शोला कार्यकर्त्यांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गर्दीचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी दिल्ली वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत काही बदल केले आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे. अशोका रोड, जय सिंह रोड, संसद मार्ग, जनपथ ते संसद मार्ग, रफी मार्ग, जंतर मंतर रोड, इम्तियाज खान मार्ग, बंगला साहिब मार्ग दुपारी अडीच ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

बाबा खड़क सिंह रोड, आउटर सर्किल कनॉट प्लेस, पार्क स्ट्रीट/शंकर रोड, मिंटो रोड, मंदिर मार्ग, बाराखंबा रोड, पंचकुइया रोड, रायसीना रोड, टॉल्सटॉय रोड, जनपथ, फिरोजशाह रोड, रफी मार्ग, डीबीजी रोड, चेम्सफोर्ड रोड, भाई वीर सिंह मार्ग, डीडीयू मार्ग, रणजीत सिंह उड्डाणपुल, तालकटोरा रोड व पंडित पंत मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी खासगी वाहने वाहनतळावर पार्किंग करावीत. सार्वजनिक वाहनांनी प्रवास करावा. रस्त्यावर वाहने उभी करु नयेत. त्यामुळे वाहतूककोंडी होऊ शकते. काही संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी. एखाद्या व्यक्तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणून द्या, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -