घरमहाराष्ट्रशिवसेनेचे सगळेच संजय बेशिस्त यात शंका नाही; भाजप आमदाराचा टोला

शिवसेनेचे सगळेच संजय बेशिस्त यात शंका नाही; भाजप आमदाराचा टोला

Subscribe

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांनी गायकवाड यांना प्रत्त्युत्तर देताना शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेतील सगळेच संजय बेशिस्त आहेत, असा टोला कुटेंनी लगावला आहे.

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीत देखील भाजप राजकारण करत असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार प्रहार केला. कोरोनाचे विषाणू मला सापडले तर ते फडणवीसांच्या तोंडात कोंबेन, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. कुटे व विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काल भाजपच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या विरोधात निदर्शनं केली होती. त्यानंतर कुटे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत, माजी मंत्री संजय राठोड यांनाही लक्ष्य केलं आहे.

- Advertisement -

आमदार डॉ. संजय कुटे यांनी ट्विट करत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत, माजी वनमंत्री संजय राठोड आणि संजय गायकवाड यांच्यार टीकास्त्र डागलं आहे. “काम कमी बाते जादा..!! शिवसेनेचे सगळेच ‘संजय’ बेशिस्त आहेत, यात आता कसलीही शंका उरली नाही…आधी राऊत, नंतर राठोड आणि आता संजय गायकवाड,” असं ट्विट डॉ. संजय कुटे यांनी केलं आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -