Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम बंगळुरूमध्ये विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू, ४ जखमी; भाजपाशी कनेक्शन?

बंगळुरूमध्ये विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू, ४ जखमी; भाजपाशी कनेक्शन?

Subscribe

एका कारने इतर वाहनांना दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू आणि दोन जण मृत्यू झाल्याची घटना बंगळुरूमध्ये घडली. मोहन (४८) असे या कार चालकाचे नाव आहे. हा अपघात सोमवारी घडला. बंगळुरूमधील ज्या रस्त्यावर अपघात झाला आहे, त्या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते.

एका कारने इतर वाहनांना दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू आणि दोन जण मृत्यू झाल्याची घटना बंगळुरूमध्ये घडली. मोहन (४८) असे या कार चालकाचे नाव आहे. हा अपघात सोमवारी घडला. बंगळुरूमधील ज्या रस्त्यावर अपघात झाला आहे, त्या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे या अपघाताचे कनेक्शन भाजपाशी जोडले जात आहे. (national car with bjp mla sticker hit vehicles in bengaluru 2 killed four injured)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मोहन KIMS हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय विद्यार्थिनी सुष्मिता हलप्पाला घेण्यासाठी जात होता. त्यावेळी त्याचे एसयूव्हीवरील नियंत्रण सुटले आणि अनेक गाड्यांना धडक दिली. या अपघातानंतर मोहनला पोलिसांनी अटक केली.

- Advertisement -

अपघाताचे भाजापाशी कनेक्शन?

बंगळुरूमध्ये ज्या कारचा अपघात झाला ती कार भाजपाचे आमदार हरतालू हलप्पा यांची असल्याचे बोलले जात होते. कारण त्या कारवर त्यांचा फोटो होता. मात्र पोलिसांनी तपासणी केली असता. अपघातग्रस्त कार भाजपा आमदार हरतालू हलप्पा यांची नसल्याचे स्पष्ट झाले. शिवाय, ही कार निवृत्त वनाधिकारी रामू सुरेश, आमदार कन्या सुष्मिता हलप्पा यांच्या सासऱ्यांची असल्याचे समोर आले. कार चालक मोहन हा सुरेशकडे काम करतो.

- Advertisement -

या अपघातानंतर पोलिसांनी कार चालक मोहनला अटक केली. यावेळी मोहने सांगितले की, एका सिग्नलवर कार थांबवली होती. मात्र त्यावेळी अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या कारने अनेक वाहनांना धडक दिली. त्यामुळे या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला असून, चार जण जखमी आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी कारचा अपघात झाला. त्यावेळी आमदार गाडीत नव्हते. या अपघातात माजीद खान आणि अयप्पा या दोन दुचारीस्वारांना कारने चिरडले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच, या अपघातात दोन कार आणि तीन दुचाकींचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी मेन्यूकार्ड जारी, ‘असे’ आहेत दर; वाचा सविस्तर

- Advertisment -