घरदेश-विदेशइंडोनेशियाकडून आजपासून पामतेल निर्यात बंद; अदानी-रामदेव बाबांच्या कंपन्यांना मोठा फायदा

इंडोनेशियाकडून आजपासून पामतेल निर्यात बंद; अदानी-रामदेव बाबांच्या कंपन्यांना मोठा फायदा

Subscribe

अदानी विल्मारचा स्टॉक गेल्या अनेक दिवसांपासून सतत अप्पर सर्किटमध्ये दिसतोय. गेल्या 5 दिवसांत यात 25 टक्क्यांनी वाढ दिसून आली.

सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार आहे. यात आता खाद्यतेलाच्या दरात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत. कारण इंडोनेशियाने 28 एप्रिलपासून खाद्यतेलाची विशेषतः पाम तेलाची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडोनेशियाच्या या निर्णयाचा भारतावरही मोठा परिणाम जाणवणार आहे.

कारण भारत हा खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयतदार देश आहे. भारत 50-60 टक्के खाद्यतेल (पाम तेल) आयात करतो. इंडोनेशियाच्या या निर्णयाचा परिमाण भारतावर जाणवण्याचे मुख्य कारण म्हणजे भारत 50 टक्क्यांहून अधिक पाम तेल इंडोनेशियातूनच आयात करतो. देशांतर्गत बाजारातील वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंडोनेशिया सरकारने हा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

खाद्य तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे.
रशिया आणि युक्रेन हा जगातील सर्वात मोठा सूर्यफूल आणि सोयाबीन तेल उत्पादक देश आहे.

पालतेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे देशांतर्गत बाजारत तेलाच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. सध्या देशातील खाद्यतेलाची बाजारपेठ अदानींच्या विल्मार आणि रुची सोया कंपन्यांनी व्यापला आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. म्हणून खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींचा थेट फायदा या दोन्ही कंपन्यांना होणार असल्याचे म्हटले जातेय.

- Advertisement -

अदानी विल्मारच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

अदानी विल्मारचा स्टॉक गेल्या अनेक दिवसांपासून सतत अप्पर सर्किटमध्ये दिसतोय. गेल्या 5 दिवसांत यात 25 टक्क्यांनी वाढ दिसून आली. अदानी विल्मारचा शेअर 5 टक्क्यांनी वाढून 843.30 रुपयांवर बंद झाला. स्टॉक लिस्टिंग झाल्यानंतरही शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येतेय. सध्या अदानी विल्मारकडे भारतीय खाद्यतेलाच्या बाजारपेठेत सर्वात मोठी पकड आहे.

रुची सोयाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

रुची सोयाच्या शेअर्समध्येही गेल्या काही दिवसांपासून मोठी तेजी सुरु आहे. रुची सोया ही योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी आहे. ब्रँडेड पाम तेलात कंपनीचा बाजारातील हिस्सा १२ टक्के आहे. बाजारात विक्री सुरु असतानाही बुधवारी रुची सोया इंडस्ट्रीजचे शेअर्क वधारले. मार्केट बंद होण्यासाठी या शेअरने सुमारे 7 टक्क्यांनी उसळली घेतली आणि 1104 रुपयांवर बंद झाला. रुची सोयाचा साठा गेल्या 5 दिवसात जवळपास 16 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या 52 आठवड्यांमधील त्याची सर्वोच्च पातळी 1,377 रुपये आहे, जी 9 जून 2021 रोजी पोहोचली.


Hijab Row : काश्मीरमध्येही हिजाब वादाची झळ; वादानंतर शाळा प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -