नायजेरियात अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी नवी मुंबईतून लढा; पंतप्रधान मोदींसह जलमंत्र्यांना पाठविले पत्र

कोल्हापुर, नागपूर, वसईतील तिघांचा समावेश

navi mumbai fights of maharashtrain youths of trapped in nigeria sent letter to pm modi and water minister

नवी मुंबई : भारतातातील १६ तरुण हे नायजेरियामध्ये अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील कोल्हापुर, नागपुर,वसईतील तीन तरुणांचा समावेश आहे. यांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी नवी मुंबईतील ऑल इंडिया सिफेरस युनियनने प्रयत्नांची पराकष्टा सुरु केली आहे. भारतातील या तरुणांनी युुनियनकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी भारत सरकार व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंदरे, शिपिंग, जलमार्ग आणि मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना पत्र पाठवून या भारत आणि महाराष्ट्रातील अडकलेल्यांची सुटका करण्याची मागणी केली आहे.

या विषयी अधिक माहिती देताना ऑल इंडिया सीफेअरर्स युनियनचे अध्यक्ष संजय पवार व कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांनी सांगितले की, एमटी हिरोइक इडुन क्रूने भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीसाठी आवाहन केले आहे. मलाबोमध्ये १६ भारतीय सिफेरर्स ताब्यात घेण्यात आले आहेत. हे जहाज ऑगस्टपासून इक्वेटोरियल गिनीमध्ये आहे. गेली तीन महिने त्याच्या सोबत गैव्यवहार करण्यात येत आहे. त्यांना अन्न पाणी नाही देत, एकाचं खोलीत जमिनीवर बसवून ठेवले आहे. अतिशय बिकट परिस्थिती आहे. यातले काही सिफेरर्स आजारी पडले आहे. त्यांच्यावर औषध उपचार सुध्दा केले जात नाही. महत्वाचा मुद्दा शिप मालकाने दंड भरल्या नंतर सुद्धा कायदेशीर कारवाई थांबवण्यात आलेली नाही. हा एक प्रकारे सिफेरर्सच्या सर्वसाधारण हक्काचे हनान आहे.

भारत सरकारने त्वरित या गोष्टीचे महत्त्व समजून हस्तक्षेप करणे गरजेचे होते. मात्र त्यावर अद्याप हालचाली सुरु झालेल्या नाहीत.ऑल इंडिया सिफेरर्स युनियनकडून या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारने तत्पतेने कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी करत पाठपुरावा सुरु केल्याचे संजय पवार यांनी सांगितले.

युनियनच्या खजिनदार शीतल मोरे यांनी सांगितले की, सिफेरर्सच्या कुटुंबातील नागरिकांच्या सोबत आणि सतत संपर्कात आहोत. त्यांना धीर देत आहोत, अश्या प्रकारे जो पर्यंत अडकेलले सीफेरर्स मायदेशी परतत नाहीत तोवर आम्ही आमचा लढा असाच सुरू ठेवणार असल्याचे म्हणाले. भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर गांभीर्याने विचार करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.


आव्हाडांवर विनयभंगाच्या कलमासह गंभीर गुन्हे नोंदवा; केतकी चितळेचं वकिलामार्फत पोलिसांना पत्र