घरदेश-विदेशनवनीत कौर राणा यांचं संसदेतलं भाषण! पाहा काय म्हणाल्या...

नवनीत कौर राणा यांचं संसदेतलं भाषण! पाहा काय म्हणाल्या…

Subscribe

पहिल्यांदाच खासदार झालेल्या राष्ट्रवादी पुरस्कृत खासदार नवनीत कौर राणा यांनी मंगळवारी संसदेत निराधारांच्या मुद्द्याला हात घातला.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून अनेक तरूण खासदार पहिल्यांदाच संसदेत गेले आहेत. त्यात खासदार अमोल कोल्हे यांनी सोमवारी संसदेत केलेलं भाषण भलतंच व्हायरल झालं. त्यानंतर आता संसदेत पहिल्यादाच गेलेल्या दुसऱ्या एक खासदार म्हणजे नवनीत कौर राणा यांचं भाषण मंगळवारी झालं. आपल्या भाषणात नवनीत कौर राणा यांनी देशातल्या निराधारांची अवस्था आणि सरकारकडून त्यांना देण्यात येत असलेल्या तुटपुंज्या मदतीवर टिप्पणी केली. ‘निराधारांना किमान २ हजार रुपयांची मदत सरकारनं करावी’, अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठल्या एका पक्षाचे नसून ते संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांनी या मुद्द्याकडे लक्ष द्यायला हवं’, असं देखील नवनीत यावेळी म्हणाल्या.

६०० रुपयात घर कसं चालणार?

यावेळी बोलताना नवनीत कौर राणा यांनी मूलभूत प्रश्न मांडला. ‘निराधारांना श्रावण बाळ निराधार योजनेमध्ये केंद्र सरकारकडून महिन्याला अवघे २०० रुपये मदत म्हणून मिळतात. त्यामध्ये भर म्हणून राज्य सरकारकडून ४०० रुपये भत्ता मिळतो. या दोघांचे मिळून त्या निराधार लोकांना फक्त ६०० रुपये महिना इतकीच मदत सरकारकडून प्राप्त होते. या ६०० रुपयांमध्ये निराधारांनी आपला उदरनिर्वाह कसा चालवायचा?’ असा सवाल अमरावती मतदारसंघातून राष्ट्रावादी काँग्रेस पुरस्कृत खासदार नवनीत कौर राणा यांनी उपस्थित केला. ‘६५ वर्षांवरच्या निराधारांना ६०० रुपये मिळतात. पण आज साधा चहा प्यायला गेलो, तरी २० रुपये लागतात, त्यामुळे या निराधारांना किमान २ हजार रुपये महिना मदत मिळावी’, अशी मागणी त्यांनी जोरकसपणे मांडली.

- Advertisement -

पाहा नवनीत कौर राणा यांनी मांडलेले मुद्दे:

घरकुल योजनेवरही मांडले मुद्दे

दरम्यान, यावेळी बोलताना नवनीत यांनी घरकुल योजनेचा उल्लेख केला. ‘महाराष्ट्रात आजमितीला केवळ ७ लाख घरकुल योजनेचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. पण इथली गरज पाहाता इथे किमान २० ते २५ लाख घरकुलांची योजना मंजूर करणं आवश्यक आहे’, असं त्या म्हणाल्या.

किल्ले रायगडला १७व्या शतकाप्रमाने बनवलं तर

किल्ले रायगडला १७व्या शतकाप्रमाने बनवलं तर जगातलं आठवं आश्चर्य होईल, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे लोकसभेतील जोरदार भाषण

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜೂನ್ 24, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -